Shreya Maskar
नृत्यांगना गौतमी पाटील थाटामाटात दिवाळीचा सण साजरा करताना दिसत आहे. नुकतीच तिने दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहे. गौतमीचा मराठमोळा साज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
गौतमीने लाल लाल रंगाची आकर्षक साडी नेसली आहे. साडीच्या काठावर क्रीम आणि सोनेरी रंगाची नक्षीदार भरतकामाची बॉर्डर आहे. साडीला गुलाबी आणि जांभळ्या छटेचा ब्लाउज परिधान केला आहे. त्यावर चंदेरी रंगाची नक्षी दिसत असून, हा ब्लाउज त्यांच्या पारंपरिक लूकला वेगळा टच देतो.
गौतमीने लांबसडक, काळे आणि सरळ केस मोकळे सोडलेले आहेत. मधून भांग पाडून केसांची हेअरस्टाइल केली आहे. कपाळावर लाल कुंकू लावले आहे. हलका मेकअप, आकर्षक डोळे आणि चेहऱ्यावरील गोड हास्य यामुळे लूक अधिक मनमोहक दिसतोय.
नाकात सुंदर नथ घातली आहे, यामुळे महाराष्ट्रीयन लूकची खासियत वाढते. हातात लाल रंगाच्या बांगड्या, सोनेरी बांगड्या आणि पिवळ्या रंगाचे ब्रेसलेट दिसत आहे. हे दागिने त्यांच्या साडीच्या रंगाशी छान जुळतात.
फोंटोमध्ये गौतमी दिवाळीचा आनंद घेताना दिसत आहे. तिच्या हातात हातात फुलझडी आहे. तसेच दुसऱ्या फोटोत हातात मातीची पेटलेली पणती धरून ती पोज देताना दिसत आहे. घरात दिवाळीची भन्नाट सजावट केलेली पाहायला मिळत आहे.
कमेंट्समध्ये चाहते गौतमीच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत. तसेच तिला दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे. 'शुभ दीपावली', 'खूप सुंदर दिसत आहेस...' अशा कमेंट्स पाहायला मिळत आहे.
गौतमी पाटील या महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना आणि अभिनेत्री आहेत. लावणी, मराठी गाणी आणि सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ यांमुळे त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली आहे. दमदार नृत्यशैलीमुळे तिचा मोठा चाहतावर्ग झाला आहे.
गौतमी पाटील आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे. अलिकडेच गौतमी पाटील 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर दिसली.