Sharad Pawar vs Ajit Pawar NCP  Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar News : 'शरद पवारांचा मुलगा असतो, तर मला संधी मिळाली असती; अजित पवारांनी सगळंच सांगितलं

Ajit Pawar on Sharad pawar News : मी शरद पवारांचा मुलगा असतो, तर मला संधी मिळाली असती. हा कुठला न्याय? असा सवाल अजित पवारांनी भरसभेत जनतेला विचारला.

रोहिदास गाडगे

पुणे : अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर मोठं वक्तव्य केलं आहे. तुमच्या स्टॅटर्जीला आजपर्यंत जी हुजूर केलं. मी शरद पवारांचा मुलगा असतो, तर मला संधी मिळाली असती. हा कुठला न्याय? असा सवाल अजित पवारांनी भरसभेत जनतेला विचारला.

अजित पवारांनी बारामतीनंतर आता त्यांच्या पक्षाचा मोर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघात वळवला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्यासाठी जोरदार प्रचार सुरु केला आहे. आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार गटाने शिरुर तालुक्यातील पाबळमध्ये सभेचं आयोजन केले होते. या प्रचारसभेत अजित पवारांनी पक्षातील जुन्या घटनांविषयी भाष्य केलं.

अजित पवार म्हणाले, 'काँग्रेससोबत जाण्यावरुनही अजित पवारांनी भाष्य काँग्रेसला विदेशी-विदेशी म्हणून सोडलं आणि नवीन पक्ष काढला. त्यानंतर चार महिन्यात पुन्हा काँग्रेससोबत गेलो, असं का तर.. शरद पवारांनी ही आपली स्टॅटर्जी असल्याचे सांगितले. आम्हीही जी हुजूर केलं. आम्हीही ६० च्या पुढे गेलो, आम्हाला कधीतरी संधी आहे की नाही, असं म्हणत मी शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती ना, हा कुठला न्याय? असा सवाल अजित पवारांनी केला.

'मी बँक व्यवस्थित सांभाळली. जिल्हा परिषद ताब्यात ठेवली. मी कोणाला वाऱ्यावर सोडत नाही. मी कामाचा माणूस आहे. मी बारामती कशा पद्धतीने बदलली, एकदा येऊन बघा. आम्ही आपला मतदारसंघ बारामती सारखा करू म्हणजे काहीतरी आम्ही केलं ना.. काही लोक बोलतात, अजित पवारांनी घोडगांगा कारखाना बंद पाडला. चेअरमन अशोक पवार यांना कारखाना सांभाळता आला नाही, कर्ज काढून वेळेत भरले नाही. आता तुमच्याकडे विकासाचे मुद्दे नाही, म्हणून दिशाभूल करायची, असे अजित पवार पुढे म्हणाले.

'शपथविधीच्या वेळी अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवार यांनी शपथ घेतली होती, अशोक पवारांचे दुखणं हे आहे की, दिलीप वळसे पाटील यांनी शपथ घेतली. त्यानंतर तिथं घोडं बिघडल आणि परत तिकडे गेले. भावनिक होऊन मतदान करू नका. आम्ही लोकांची काम करायला आहे मी प्रत्येक आमदार निधी दिला, असे अजित पवार यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : दिवसभरात आर्थिक चणचण भासणार, प्रेमामध्ये अपयश मिळणार; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

Gajkesri Rajyog 2025: 22 जुलैला बनणार पॉवरफुल गजकेसरी राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार पैसाच पैसा

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

SCROLL FOR NEXT