Ajit Pawar vs Sharad Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : पाडवे दोन, भाऊबीज एक? बारामतीत पवार कुटुंबीयांचे पहिल्यांदाच दिसले २ पाडवे, पाहा व्हिडिओ

Sharad pawar vs Ajit Pawr : शिवसेने फूटीनंतर जसे दोन-दोन दसरा मेळावे झाले अगदी तसंच आज पवारांच्या कुटुंबात झालं. तळागळातील कार्यकर्त्यांपासून ते संसदेतील सदस्यांपर्यंत प्रत्येकाला आकर्षण असणाऱ्या पवारांच्या पाडव्यामध्ये आज दुफळी दिसली. होय आज बारामतीत दोन दिवाळी पाडवे साजरे झाले. दोन पाडवे साजरे का झाले पाहूया..

Snehil Shivaji

मुंबई : शिवसैनिकांचं जसं दसरा मेळाव्याकडे लक्ष असतं तसंच बारामतीतील पवारांच्या पाडव्याचं कार्यकर्त्यांना विशेष आकर्षण असतं. गेल्या अनेक दशकापासून दिवाळीच्या निमित्तानं पाडव्याच्या दिवशी शरद पवार बारामतीत गोविंद बागेत आपल्या कार्यकर्त्यांना भेटतात. जगाच्या पाठीवर पवार कुठेही असले तरी दिवाळीला मात्र बारामतीत येऊन आपल्या कार्यकर्त्यांना भेटतात.यंदा मात्र ही परंपरा खंडित झाली अन् पवारांच्या बारामतीत दोन राष्ट्रवादीप्रमाणे दोन पाडवेही पाहायला मिळाले.

शिवसेना फुटल्यानंतर जसे शिंदे आणि ठाकरेंचे दोन दसरा मेळावे झाले अगदी तसेच आजही बारामतीत तसेच दोन पाडवे झाले. अर्थातच दोन्ही पाडव्यांमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी मात्र जोरदार होती. मात्र, पवारांची भाऊबीज मात्र एकच होणार असल्याचं खुद्द अजित पवारांनी म्हटलंय.

गेल्या वर्षभरात पवार कुटुंबातील संबंध प्रचंड ताणले गेले हे वेगळं सांगायला नको. अजित पवार पवारांची साथ सोडत थेट सत्तेत सामिल झाले आणि वातावरणपुर्ण बदललं. अजितदादांनी राष्ट्रवादीवरच थेट दावा करत पक्ष आणि चिन्ह मिळवलं, बारामती लोकसभेला बहिण सुप्रिया सुळेंच्या विरोधात आपली पत्नी सनेत्रा पवारांना उभं करुन शरद पवारांना खुल्लं आव्हान दिलं.

आता शरद पवारांनी देखील अजित पवारांना शह देण्यासाठी थेट योगेंद्र पवारांना अजित दादांविरोधात उभं करुन आणि आज पाडव्याला शेजारी बसवून बारामतीकरांना नव्या दादाची ओळख करुन दिली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात अश्वक्रीडेदरम्यान अपघात

Nauvari Saree Draping: नऊवारी नेसायला जमत नाही? मग सुंदर मराठमोळ्या लूकसाठी 'या' सोप्या पद्धतीने नेसा नऊवारी

Green Tea Benefits : वजन कमी करण्यापासून ते आजारांशी दोन हात करेपर्यंत...; 'हे' 2 पदार्थ मिसळून ग्रीन टी पिण्याचे ६ जबरदस्त फायदे

Male Birth Control Pill: आता पुरूषांसाठी देखील गर्भनिरोधक गोळी, कशी करते काम? वाचा सविस्तर...

Chemical Free Facewash For Pimple And Dark Spots: पिंपल्स आणि काळ्या डागांवर सोपा घरगुती उपाय, घरच्या घरी बनवा केमिकल फ्रि फेसवॉश!

SCROLL FOR NEXT