Ajit Pawar Reaction on Meet Amit Shah  Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: अमित शहांसोबतची दिल्लीतील भेट लांबणीवर का पडली? अजित पवार म्हणाले...

Ajit Pawar Latest News: अमित शहा यांच्यासोबतची भेट लांबणीवर का पडली? यावर स्वत: अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Satish Daud

Ajit Pawar Reaction on Meet Amit Shah

राज्यात निर्माण झालेल्या शेतकरी प्रश्नाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार होते. मात्र, अचानक त्यांची भेट लांबणीवर पडली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सूलट चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, अमित शहा यांच्यासोबतची भेट लांबणीवर का पडली? यावर स्वत: अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज भल्यापहाटे पुण्यात आले होते. यावेळी महात्मा फुले वाड्यात असणाऱ्या चेंबरमुळे व्यक्त केली. हे चेंबर तातडीने काढून टाका अशा सूचना देखील अजित पवार यांनी आयुक्तांना दिला. चेंबरच्या जागी सलग फरशी बसवा, असे आदेश देखील अजित पवारांनी दिले.

अमित शहांसोबतची भेट लांबणीवर का पडली?

राज्यातील शेतकरी प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी तुम्ही दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेणार होते, मग ही भेट लांबणीवर का पडली? असा प्रश्न पत्रकारांनी अजितदादांना विचारला. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, अमित शहा यांचे राज्यसभा आणि लोकसभेत काम सुरू आहे.

"त्यामुळे ते आता भेटणार नाहीत. त्यांचं काम झालं की, ते आम्हाला भेटायला दिल्लीत बोलावणार आहे. मी आज पुण्यात असून उद्या बारामती दौऱ्यावर राहणार आहे. यादरम्यान, अमित शहांचा फोन आला तर आम्ही आमचे दौरे रद्द करून अमित शाह यांना भेटण्यासाठी जाणार आहे", असं अजित पवार म्हणाले.

जरांगेंच्या अल्टिमेटमवर अजितदादांची प्रतिक्रिया

मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी राज्य सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. आज जरांगे यांची बीडमध्ये इशारा सभा होणार आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, कोणी काही मागणी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. नियमांत आणि कायद्याच्या चौकटीत बसतील अशा गोष्टी सरकारला कराव्या लागतात.

"राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आरक्षण दिलं होतं. पण ते कोर्टात टिकलं नाही. फडणवीस यांनी अभ्यास करून दिलेले हायकोर्टात टिकलं, पण सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही. आता पुन्हा टिकणारं आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असेल, त्यासाठी जरांगेंनी सरकारला वेळ द्यावा", असंही अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

SCROLL FOR NEXT