Ajit Pawar Saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar On Barsu Refinery Protest: संवादातून मार्ग निघेपर्यंत सर्वेक्षण थांबवावं; अजित पवारांचं सरकारला आवाहन

Ajit Pawar News: हे आंदोलन मानवी दृष्टीकोनातून संवेदशीलपणे हाताळावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

Satish Daud

Ajit Pawar On Barsu Refinery Protest: रत्नागिरीतील बारसू रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक भूमीपूत्रांची, आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची पोलिसांकडून मुस्कटदाबी सुरु आहे. आंदोलकांना अटक करण्यात येत आहे. पत्रकारांना धमकावण्यात येत आहे. या मुस्कटदाबी, धमकीसत्राचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. (Latest Marathi News)

लोकशाही व्यवस्थेत शांततामय मार्गानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार असून राज्य सरकारने आंदोलकांच्या भावनांचा आदर करावा, पोलिसांची दडपशाही थांबवावी, हे आंदोलन मानवी दृष्टीकोनातून संवेदशीलपणे हाताळावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच विकासाची भूमिका घेतली आहे, परंतु विकास सर्वांना विश्वासात घेऊन केला पाहिजे. स्थानिक भूमीपूत्रांच्या हितांचं, हक्कांचं रक्षण झालं पाहिजे. स्थानिक भूमीपुत्रांच्या मनातल्या शंका-कुशंका दूर करुन त्यांना विश्वासात घ्यावं, असा सल्ला  अजित पवारांनी (Ajit Pawar) दिला आहे.

त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थ, तरुण, महिलावर्गावर पोलिसांकडून दडपशाही करण्यापेक्षा समन्वय, संवादातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. संवादातून मार्ग निघेपर्यंत सर्वेक्षण थांबवावं, असे आवाहन देखील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. (Breaking Marathi News)

शरद पवारांची उदय सामंत यांच्याशी चर्चा

कोकणातल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोन करत सर्वे थांबवण्याबद्दल चर्चा केल्याचे समोर आले आहे. (Maharashtra Political News)

या चर्चेमध्ये शरद पवार यांनी "हा सर्वे थांबवा, लोकांशी आपण चर्चा करुया, एकत्र बसून विश्वासात घेऊन केलं पाहिजे नाहीतर, प्रोजेक्ट अडचणीत येईल," अशी भूमिका मांडली आहे.

तसेच शरद पवार यांनी "या आंदोलनात ज्यांना अटक केली त्यांना सोडून द्यावे, असेही सांगितले आहे. शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उदय सामंत यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना कळवतो, असे आश्वासन दिले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT