Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar on Election: मीच कमी पडलो; लोकसभेतील पराभवावर अजित पवारांची जाहीर कबुली

Ajit Pawar Press Conference on Maharashtra Election 2024 Result: आज अजित पवार गटाच्या राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

Bharat Jadhav

मुंबई: अपयशासाठी कोणाल दोष देणार नाही. अपयश माझ्यामुळे आले. मीच कुठे तरी पडलो असल्याची जाहीर कबुली अजित पवारांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकाच्या निकालानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषदत घेतली. या बैठकीत पराभवाची कारणे काय होती,यावर चर्चा झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी लोकसभेत पराभव का आला याची कारणे सांगताना त्यांनी पराभवाची जबाबदारी घेतली. त्यात लोकसभेचा निकाल असा का लागला. कोणत्या गोष्टी चुकल्या याची माहिती घेण्यात आली,आणि त्यावर चर्चा झाल्याचं अजित पवार म्हणाले.माध्यमांमध्ये चालू असलेल्या वृत्तावरुन आपण आमदारांची बैठक आज संध्याकाळी आमदारांची बैठक बोलवली. माध्यमांमध्ये आमदारांनी शरद पवार गटासोबत संपर्क साधल्याचं वृत्त दिलं जात होतं. त्यामुळे सर्व आमदारांची बैठक घेण्यात आली.

जे आमदार आले नाहीत त्यांनी फोन करुन संपर्क साधला. त्यामुळे सर्व आमदार आमच्यासोबत असल्याचंही अजित पवार यावेळी म्हणाले. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना विरोधकांनी चालवला संविधान बदलाचा प्रचार हा आमच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला. संविधान बदलणार नाही हे पटवून देण्यात आम्ही अपयशी ठरलो. चारशे पारचा नाराही त्यामागे कारण असल्याचं अजित पवार म्हणाले. यावेळी मुस्लीम समाज आमच्यापासून दूर गेला असल्याचं अजित पवार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 40 वर्षापासून सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी का कारवाई केली नाही - अण्णा बनसोडे

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; 'या' महिलांवर कडक कारवाईचे संकेत

Heart Attack: सकाळी उठल्या उठल्या शरीरात 'हे' ६ बदल दिसल्यास दुर्लक्ष करू नका; असू शकतो हृदयविकाराचा झटका

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, मराठवाड्यावर सर्वात मोठं सकंट; हवामान विभागाच्या अंदाजाने धाकधूक वाढली

Monsoon Picnic Tourism: धुक्याने वेढलेले डोंगर, खळखळणारे धबधबे आणि हिरवाईचा साज पाहायचाय? मग ही TOP 10 ठिकाणं नक्की यादीत ठेवा

SCROLL FOR NEXT