शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पूर्ण माहिती घेतल्यानंतरच- अजित पवार Saam Tv
मुंबई/पुणे

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पूर्ण माहिती घेतल्यानंतरच- अजित पवार

पूरपरिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : महाराष्ट्रात Maharashtra गुलाब चक्रीवादळामुळे Gulab Cyclone हाहाकार माजला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पिक पाण्यात वाहून गेले आहेत. हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेले आहेत. कालच मुख्यमंत्र्यांनी CM Uddhav Thackeray मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले आहे. तर मात्र केंद्र सरकारकडून पूरग्रस्तांना मदत करताना दुजाभाव करण्यात आला आहे. राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत असताना केंद्रानेही समान मदत करावी असे म्हणत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी Ajit Pawar या परिस्थितीत राजकारण करत असलेल्या विरोधकांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

हे देखील पहा-

बंगाल उपसागरात Bay Of Bengal गुलाब चक्रीवादळामुळे Gulab Cyclone मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पूरपरिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद Press Conference घेतली. यावेळी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीवरून मोदी सरकारवर पवारांनी टिकास्त्र साधले आहे-

ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांकडून मागणी;

पावसामुळे पूरपरिस्थितीमुळे राज्यात नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी वेगवेगळ्या पक्षांकडून मागणी केली जातेय असे अजित पवार म्हणाले. तर महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. असही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

पिकविम्याचे पैसे मिळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील - अजित पवार

पीक विम्याचे पैसे कसे मिळवता येतील याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आलेत. पालकमंत्री त्या त्या भागात दौऱ्यावर आहेत. अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करायचं‌ काम सुरुय. केंद्र सरकारनं दुजाभाव करु नये. आम्ही पैसे मागितले तर पैसे मिळत नाही. पण काही राज्यांना पैसे न मागता दिले जातात हे अयोग्य आहे. असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच सगळी माहिती आल्याशिवाय तसा निर्णय घेता येत नाही. तसेच पूरग्रस्त भागांचे सर्वेक्षण होणं महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.

तलावातला गाळ काढला तो वरच्या बाजूला टाकायचो नसतो;

मग कोल्हापूर सांगली रायगड इथे पूर आला त्याला काय कारण आहे? हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. आज तिथल्या माणसांना आधार देणे महत्वाचे आहे. तलावातला गाळ काढला तो वरच्या बाजूला टाकायचो नसतो. शेतकरी अनेकदा तो गाळ वापरतात. काही भागात प्रचंड पाऊस पडला. पाणी आता ओसरेल आहे पूर्वपदावर येत आहे. शेतीचे नुकसान झाले. सोयाबीन, कपाशीचे नुकसान झाले आहे.

पद भरती प्रस्ताव- आजचा दिवस संपला नाही;

कालच मुख्य सचिवांना सांगितलं ज्या विभागाचे प्रस्ताव आला ते MPSC ला पाठवून द्या. उद्या याबाबत आढावा घेऊ. कोणत्या डिपार्टमेंट ने माहिती दिली कोणी नाही दिली आहे.

टप्प्याटप्प्याने गोष्टी सुरु करणार;

लॉकडाऊन तसेच कोरोना नियमांबद्दल आणि सद्याच्या कोरोना परिस्थिबद्दल अजित पवार म्हणाले, अंदाज घेत निर्णय घेतो. कोरोनाची परिस्थिती कोरोना कमी झाली नाहीय. तर महाराष्ट्रात लवकरच वेगळं चित्र दिसेल. कोरोना व्हायरसचे संकट अद्यापही टळलेलं नाही. नागरिकांनी मास्क घालण्यास दिरंगाई करू नये. काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे असे अजित पवारांनी सांगितले.

त्रिसदस्यीय प्रभाग समितीला कॉंगेसच्या काही नेत्यांचा विरोध;

त्रिसदस्यीय प्रभाग समितीला कॉंगेसच्या Congress काही नेत्यांचा विरोध आहे. संपूर्ण पक्षाचा विरोध नाही, अशोक चव्हाण Ashok Chavan म्हणाले चारचा प्रभाग करा. महापालिका प्रभागावरून दोन्ही काँग्रेसच्या रोषाचा अंत न पाहताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी नव्या प्रभाग पद्धतीचा मसुदा राज्यपालांकडे Bhagarsingh Koshyari दिला आहे. त्यावर राज्यपालांच्या सहीची अपेक्षा असल्याचे अजित पवारांनी सांगितले. आघाडी सरकार चालवताना निर्णय झाल्यावर समाधानी राहायचं असत असे अजित पवार म्हणाले.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

Numerology: या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती असतात लकी; प्रेमात अन् करिअरमध्ये मिळते यश

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

SCROLL FOR NEXT