Police action underway after allegations of silver anklets being distributed to voters in Pune municipal elections. Saam Tv
मुंबई/पुणे

प्रभागात वाटले शिक्षकांना हाताशी धरून चांदीचे जोडवे! अजित पवारांच्या महिला उमेदवारावर गुन्हा दाखल

Ajit Pawar NCP Woman Candidate Silver Anklets Case: पुण्यातील हिंगणे होम कॉलनी प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवाराकडून मतदारांना चांदीचे जोडवे वाटल्याचा आरोप केला आहे. भाजपच्या तक्रारीनंतर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Omkar Sonawane

राज्यात काही तासांनी 29 महापालिकेचे भवितव्य कोणत्या पक्षाच्या हातात जाणार हे समजणार आहे. यंदाची महापलिका निवडणूक ही 10 वर्षांनी होत असल्याने राज्यात मोठे राजकारण तापले आहे. मित्रपक्षच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असून भाजपमध्ये तर सर्वात मोठी बंडखोरी आणि बी फॉर्मवरून राडा दिसून आला.

निवडणूक म्हटले की मतदारांवर आश्वासनाचा पाऊस पाडायचा आणि त्यामध्ये भिजवायचे. इथेच न थांबता निवडणुकीला काही तास शिल्लक असताना पैसे उधळायचे आणि मत विकत घ्यायची हा प्रकार अनादीकाळापासून सर्हासपणे लोकशाही असलेल्या देशात सुरू आहे. अशातच पुणे येथे अजित पवारांच्या उमेदवाराने थेट चांदी वाटल्याने या महाशायवर गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष जोरदार पाहायला मिळत आहे. इकडे अजित पवार मेट्रो प्रवास फुकट करण्याच्या बाता मारत आहे आणि दुसरीकडे त्यांच्या महिला उमेदवार चांदीच्या वस्तु देऊन एकप्रकारे मत विकत घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

पुण्यातील प्रभाग क्रमांक 30 हिंगणे होम कॉलनी मध्ये शिक्षकांना हाताशी घेऊन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराकडून मतदारांना चांदीच्या वस्तू वाटून मत मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणी आता वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुण्यातील हिंगणे होम कॉलनी कर्वेनगर भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारांना प्रलोभने दाखवून चांदीचे जोडवे वाटण्याचा प्रकार घडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या उमेदवार संगीता बराटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा जाहीर निषेध भाजपच्या वतीने करण्यात आला असून कारवाईची मागणी भाजपकडून होत आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: राजकोटच्या मैदानावर केएल राहुलचा जलवा, शतकानंतर खास सेलिब्रेशन; भारताचं न्यूझीलंडसमोर २८५ रन्सचं आव्हान

Maharashtra Live News Update: धुळ्यात मतदानापूर्वीच खळबळ, देवपूरमध्ये शेकडो मतदान कार्डांचासाठा

Facial Hair in Women: महिलांना दाढी मिशी का येते? माहितीये का कारण?

मुंबईत मोठा राडा; ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची हाणामारी, नेमकं काय घडलं?

Lighweight Saree Designs: दिवसभर साडीत राहायचंय? मग हलक्या साड्यांचे 'हे' 5 लेटेस्ट पॅटर्न नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT