Chandrakant Patil Vs Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Guardian Minister: चंद्रकांत पाटील यांच्या हातून पुणे जाणार? अजित पवार होऊ शकतात नवीन पालकमंत्री

चंद्रकांत पाटील यांच्या हातून पुणे जाणार? अजित पवार होऊ शकतात नवीन पालकमंत्री

साम टिव्ही ब्युरो

Chandrakant Patil Vs Ajit Pawar: पुण्याच्या पालकमंत्रीपदाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार हे पुण्याचे नवीन पालकमंत्री होऊ शकतात, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'साम' टीव्हीला दिली आहे. सध्या चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री आहेत.

मात्र त्यांचं पालकमंत्रिपद जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री म्हणून पुण्यात चंद्रकांत पाटील सक्रिय नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यातच आता नवीन माहिती समोर आली आहे की, अजित पवार यांना पुण्यातील पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आजू शकते. इतकंच नाही तर 10 ते 12 पालकमंत्रिपद हे अजित पवार गटाला देण्यात येणार आहे.  (Latest Marathi News)

पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. २००४ ते २०१४ या आघाडी सरकारच्या कालवधीत पवार यांच्याकडे हे पद होते. तर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर ही अजित पवार यांच्याकडेच हे पद आले होते. मात्र, वर्षभरापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी आली. 

दरम्यान, पुणे शहर व जिल्ह्यात मिळून २१ आमदार आहेत. शहराचा विचार केला तर ८ आमदारांपैकी ५ भाजपचे, २ राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि १ आमदार काँग्रेसचा आहे. आगामी काळ हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आहे. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : क्षणभर विश्रांती! आदित्य ठाकरेंनी प्रचारादरम्यान लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद

Liver Health: हे '४' पेय करतात यकृतावर गंभीर परिणाम ; तुम्हीही करता का या पेयांचे सेवन, वेळीच व्हा सावध

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

Maharashtra Politics : भाजपला विनंती, उद्धव ठाकरे म्हणाले मी बोलणी करायला तयार

Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

SCROLL FOR NEXT