Ajit Pawar  Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar: अजित पवारांच्या अडचणी वाढणार? ईडीने पुन्हा उघडली सिंचनाची फाईल

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. सिंचन घोटाळ्याची फाईल ईडीने पुन्हा उघडली आहे. १९९९ ते २००९ पर्यंत झालेल्या घोटाळ्यातील कागदपत्रे ईडीच्या हवाली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा पुन्हा एकदा लागू शकतो.

काही दिवसापूर्वी या संदर्भात अजित पवार यांना क्लिनचीट देण्यात आली होती, पण उच्चा न्यायालयाने या क्लिनचीटवर शिक्कामोर्तब केलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात गेल्यानंतर अधिवेशनाच्या तोंडावर या चौकशीची बातमी आली आहे.

हे देखील पाहा

हजारो कोटी खर्च करुन केवळ ०.१ टक्के सिंचन क्षमता निर्माण झाली, असे ताशेरे त्यावेळे कॅगने ओढले होते. या सिंचन घोटाळ्याबाबात नागपूर खंडपीठात याचिका प्रलंबित आहे. काही दिवसापूर्वी या संदर्भात एसीबीने अजत पवार यांनी क्लिनचीट दिली होती. मात्र उच्च न्यायालयाने या क्लिनचीटवर अद्याप शिक्कामोर्तब केलेला नाही.आता या संदर्भातील चौकशी ईडी पुन्हा सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. (Ajit Pawar Latest News)

शिंदे-फडणवीस सरकारने १९९९ ते २००९ पर्यंत झालेल्या घोटाळ्यातील कागदपत्रे ईडीच्या हवाली करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा पुन्हा एकदा लागू शकतो, असे बोलले जात आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT