Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

Ajit Pawar latest Speech : अजित पवारांनी भरसभेत बारामतीच्या विकासाचा पाढा वाचला. तसेच सभास्थानी गर्दीमुळे झालेल्या गैरसोयीची चूकही मान्य केली.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही

बारामती : आज बारामतीत अजित पवार गटाने जंगी सभा आयोजित केली आहे. बारामतीत अजित पवार यांच्या सभेसाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. दोन दिवसांनी मतदान असणार असल्याने कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली आहे. अजित पवारांच्या सांगता सभेत बारामतीकरांनी अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. 'तुमच्या गर्दीचा अंदाज चुकला. तुमची गैरसोय झाली. आपल नातं कळल नाही, अशी कबुली अजित पवारांनी दिली.

अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे

मला सहा वाजता थांबायचं आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल, दादा तुम्ही बोललाच नाही.

आज सांगता सभा घेतो आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील फार महत्वाचा दिवस आहे.

महायुती उमेदवार म्हणून आशीर्वाद घ्यायला आलो आहे. मी विधानसभा निवडणुकीत आठव्यांदा तुमच्या समोर उभा आहे.

आज तुमच्या गर्दीचा अंदाज चुकला आहे. तुमची गैरसोय झाली. आपलं नातं कळलं नाही. सगळ्यांचे डिपॉझिट फक्त बारामतीकरच जप्त करू शकतात.

मला विक्रमी मतांनी निवडून दिलं. त्यामुळे मी भरघोस निधी आणला. तीन वर्षात ९ हजार कोटी रुपये बारामतीचा विकासासाठी आणले.

माझ्या मनात संमिश्र प्रकारच्या भावना आहेत. मागील 35 वर्षांपासून बारामतीकर मत देत आहात. मी ९९ साली झालेल्या सभेत टेन्शनमध्ये होतो. तेव्हा सर्वपक्षीय होतो. मला त्यावेळीही चांगल्या मताने विधानसभेत पाठवलं.

आपण काम करताना जबाबदारी आहे, असं काम करत होतो.

मुलींना शिक्षणासाठी पैसे नसल्याने एका मुलीने आत्महत्या केली. आम्ही त्यावर सरकारमध्ये बसलो, काही नवीन कल्पना सुचली.

त्यामुळे अर्धी फी भरण्यासाठी निर्णय घेतला. आपला बजेट साडे सहा कोटी आहे. त्यातील अर्धी रक्कम पगारांवर खर्च होतो.

१९९१ पासून कधी मागे वळून पाहिलं नाही. पवार साहेबांसारखा नेता बारामतीकरांचे नेतृत्व म्हणून काम करत होता. साहेबांनी संधी दिली तेव्हा पासून झोप गेली. तेव्हापासून विकास कामे केली.

एका फटक्यात त्याचं महत्व समजत नाही. मात्र दोन चार हेलपाटे मारायला लावले की, त्याचं महत्व समजतं.

मला एका वस्तादाने सांगितले की, एकदा आले लगेच काम करू नका. दोन चार हेलपाटे मारू द्या.

बारामती बस स्टँड आणि इतर विकास बघा. पाणी कमी पडू देत नाही. भोरचं बस स्टँड जाऊ पाहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT