Ajit Pawar New President of NCP Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar New President of NCP: शरद पवार यांच्या अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह? अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात मोठा दावा

शरद पवार यांच्या अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह, अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात मोठा दावा

Rashmi Puranik

Ajit Pawar New President of NCP: राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने शरद पवार यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. अजित पवार गटाने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांच्या नेमणूकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून २०२२ मध्ये झालेली नेमणूक ग्राह्य धरता येणार नाही. कारण तेव्हा झालेल्या राष्ट्रीय बैठकीचेपुरावे अस्तित्वात नाही. तसेच कोणीही या बैठकीला उपस्थित नव्हते आणि याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्हावर दावा

आज अजित पवार यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. त्यांनी निवडणूक आयोगात एक याचिका दाखल केली असून ही याचिका आयोगाला प्राप्त झाली आहे. या याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाची निशाणी घड्याळ या दोन्हींवर दावा सांगण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

यातच अशी माहिती समोर आली आहे की, अजित पवार यांनी दोन दिवस आधीच निवडणूक आयोगात ही याचिका दाखल केली होती. या आयाचिकेत ४० आमदारांनी सही केलेलं पात्र देखील असल्याचं समजतं आहे. यामध्ये अजित पवार यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, आज झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना उद्देशून म्हणाले की, मचं वय झालंय, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? ते म्हणाले, ''काल आपले वरिष्ठ नेते चव्हाण साहेबांच्या समाधीच्या ठिकाणी गेले. ठिक आहे चव्हाण साहेब आपल्या सर्वांचे दैवत आहे. माझ्याकडूनही घोडचूक झाली होती. मी तिथे सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत न पाणी पिता बसलो होतो. मला ते खूप मनाला लागलं होतं. परंतु मित्रांनो आता वय 82 झालं, 83 झालं तुम्ही कधी थांबणार आहा की नाही? तुम्ही आशिर्वाद द्या ना... आम्हाला वाटतं तुम्ही शतायुषीय व्हावं.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : मुलांची परीक्षा फी भरली, आयोगानं थेट उमेदवाराला पाठवली नोटीस!

Almond Milk: बदामाचे दूध प्यायल्यास काय होते?

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

ITBP Recruitment: १२ वी पास तरुणांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिना ९२००० रुपये पगार, अर्ज कसा करावा?

Astro Tips: हातात घड्याळ घालताय? या चुका टाळा अन्यथा...

SCROLL FOR NEXT