Ajit Pawar Group On Sharad Pawar Meeting SAAM TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar Group On Sharad Pawar Meeting: शरद पवारांना बैठक बोलवण्याचा अधिकार नाही, अजित पवार गटाचा मोठा दावा

NCP Delhi Meeting: शरद पवार यांना बैठक बोलावण्याचा अधिकार नसल्याचा दावा, अजित पवार गटाने केला आहे.

Rashmi Puranik

Deputy CM Ajit Pawar: राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाल्यानंतर राजकीय हालाचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री (Deputy CM) पदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादीच्या ४० पेक्षा जास्त आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला. पण शरद पवार यांनी चिन्ह जाऊन देणार नाही असे खडसावून सांगितले. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेतली. यावर अजित पवार गटाने आक्षेप घेतला आहे. शरद पवार यांना बैठक बोलावण्याचा अधिकार नसल्याचा दावा, अजित पवार गटाने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाने शरद पवार यांनी दिल्लीमध्ये घेतलेल्या बैठकीवर आक्षेप घेतला आहे. शरद पवार यांना आज बैठक बोलावण्याचा अधिकार नाही. आजची ही बैठक बेकायदेशीर आहे. आता अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे अशी बैठक शरद पवार बोलवू शकत नाही. त्यामुळे या बैठकीत झालेले निर्णय बेकाकायदेशीर असतील. ते कोणालाही लागू होणार नाही, असा दावा अजित पवार गटाने केला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.

शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी, राष्ट्रीय पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पीसी चाको, योगानंद शास्त्री, विरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, फौजिया खान, वंदना चव्हाण यांच्यासह १३ नेते उपस्थित आहेत.

या बैठकीवर अजित पवार गटाने सवाल उपस्थित केले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष असताना शरद पवार यांनी आजची बैठक बोलावलीच कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने बैठक बोलावण्याचा शरद पवारांना अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 'हे' व्यायम नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT