NCP Crisis Sharad Pawar vs Ajit Pawar  saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political News: ...तर शरद पवार NDA च्या बैठकीत दिसले असते? त्या २ दिवसांत नेमकं काय घडलं?

Maharashtra Political News: अजित पवार गटाने शरद पवारांनाच फोडण्याचा राजकीय प्लान आखला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Vishal Gangurde

प्रमोद जगताप

New Delhi: राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांनी दंड थोपाटले आहे. राष्ट्रावादीच्या फुटीनंतर दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या दोन्ही गटाच्या आरोप-प्रत्यारोपाच्या दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार गट आणि शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट झाली. याचदरम्यान, अजित पवार गटाने शरद पवारांनाच फोडण्याचा राजकीय प्लान आखला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest marathi News)

अजित पवारांनी शिंदे सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. अजित पवारांसोबत ९ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या वेगळ्या भूमिकेमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं.

दरम्यान, अजित पवारांनी शिंदे सरकार पाठिंबा देत काल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीलाही हजेरी लावली. या बैठकीला अजित पवार यांच्यासहित खासदार प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

दरम्यान, दिल्लीतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या या बैठकीला शरद पवार यांनाही आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्याला शरद पवार यांचा विरोध होता. विशेष म्हणजे दिल्लीत होणाऱ्या बैठकीसाठी शरद पवारांनाही बोलावण्यात आलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

'बैठकीसाठी २ दिवस राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटून विनंती करत होते. पण पवार विरोधावर ठाम होते. राष्ट्रवादीच्या आमदार माफी मागण्यासाठी नसून दिल्लीतील बैठकीसाठी शरद पवारांना आग्रह करत होते, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजितदादा दिवाळीनंतर करणार होते बंड

दरम्यान, अजित पवार हे बंड दिवाळीनंतर करणार होते. मात्र, अजित पवार यांनी दिवाळीआधीचं बंड केलं. कारण महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेतही अजित पवार जास्त बोलत नव्हते. मात्र विशेष म्हणजे या सभांना जनतेतून प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे अजित पवारांना भाजप हायकमांडने वेळेआधी बंड करण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, अजित पवार गटातील आमदार हे गेल्या दोन दिवसांपासून शरद पवारांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी विनंती करत होते. परंतु शरद पवार त्यांच्या निर्णयावर ठाम होते. अजित पवार गटाचा प्लान यशस्वी झाला असता तर शरद पवार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला दिसले असते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT