Sanjay raut News:'मी गांधीजींचा भक्त,वाईट बघत नाही'; किरीट सोमय्या प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay raut News: 'मी गांधीजींचा भक्त आहे. मी वाईट बघत नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
Shivsena Sanjay Raut News
Shivsena Sanjay Raut NewsSaam TV
Published On

sanjay Raut News: किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणावरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. काल किरीट सोमय्या प्रकरणाचे पडसाद विधीमंडळातही उमटले. या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'मी गांधीजींचा भक्त आहे. मी वाईट बघत नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. (Latest Marathi News)

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत देशासहित राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. तसेच काल विरोधी पक्षांची बैठक बंगळुरु येथे झाली. या बैठकीविषयी भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, 'काल 26 पक्षांची बैठक झाली, ते 26 पक्ष या देशाच्या कानाकोपऱ्यातील उरलेले महत्त्वाचे पक्ष आहेत. सत्ताधारी भाजपला 9 वर्ष त्यांना आठवण झाली नाही. आम्ही जमतोय म्हटल्यावर मोदींना 'एनडीए'ची आठवण झाली. आपले मित्र पक्ष आठवले नव्हते, आमचे सहकार पक्ष आठवले नव्हते. मोदी शहांच्या गटाला एनडीए आठवले'.

Shivsena Sanjay Raut News
Jitendra Awhad on Kirit Somaiya: राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला, एखाद्याचे राजकीय जीवन संपवाण्याच्या प्रकाराचा मी निषेध करतो - जितेंद्र आव्हाड

'वारंवार मोदींनी आपल्या भाषणात आम्ही म्हणजे इंडिया असं म्हटलं आहे. मोदी म्हणजे इंडिया नाही, बीजेपी म्हणजे इंडिया नाही, प्रत्येक व्यक्ती इंडिया आहे. तुमच्या बाजुला सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा, सगळे भ्रष्टाचारीसोबत घेऊन तुम्ही आमच्याबरोबर भ्रष्टाचाराचा आरोप करत आहात, हे जरा बंद करा. आम्ही म्हणजे इंडिया स्वतःला मानत नाही, या देशाचा प्रत्येक नागरिक इंडिया आहे, असे संजय राऊत म्हणाले.

'आम्ही 26 पक्ष एकत्र आल्यानंतर तुमचं कमळाचे फुल फुलायला लागलं, तोपर्यंत आठवण नव्हती. हा इंडिया तुमच्या हुकूमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. यंदा इंडिया जिंकणार, भारत जिंकणार हुकूमशाहीचा पराभव होणार आहे. तुमच्याकडे जेलमध्ये जाता जाता असे घेतलेले लोक आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा देखील जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. आम्ही काही म्हणतोय का, असा सवाल करत राऊतांनी टीका केली .

Shivsena Sanjay Raut News
Maharashtra Politics News: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि PM मोदी यांच्यात काय चर्चा झाली?; मोठी माहिती आली समोर

'आम्ही भारत आहोत, या देशाचा प्रत्येक नागरिक भारतीय आहे. नरेंद्र मोदी म्हणजे भारत नाही, या देशाच्या 140 कोटी जनता म्हणजे भारत आहे, आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करत आहोत, असे राऊत पुढे म्हणाले.

किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणावरही राऊत यांनी भाष्य केले. 'मी एकच सांगतो मी गांधींजींचा भक्त आहे. मी वाईट बघत नाही. तसेच वाईट बोलत नाही. ज्यांनी पाप केलं आहे. त्यांना भोगावं लागेल, असे राऊत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com