Ajit Pawar  Saam tv
मुंबई/पुणे

Maval Lok Sabha Constituency: मावळमध्ये राष्ट्रवादीचाच खासदार निवडून आणायचा; लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने कसली कंबर

Maval Lok Sabha Constituency Latest Update : काही राजकीय पक्षातील नेत्यांकडून लोकसभा मतदारसंघावर हेवेदावे देखील सुरु झाले आहेत. याचदरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा केला आहे.

दिलीप कांबळे

Maval Lok Sabha Constituency Politics :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. सर्व राजकीय पक्षाकडून मतदारसंघाची चाचपणी सुरु झाली आहे. तर दुसरीकडे काही राजकीय पक्षातील नेत्यांकडून लोकसभा मतदारसंघावर हेवेदावे देखील सुरु झाले आहेत. याचदरम्यान, महायुतीमध्ये राज्यातील लोकसभा निवडणुकीबाबत जागावाटपाची चर्चा सुरु असताना मावळ लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा केला आहे. (Latest Marathi News)

मावळ लोकसभा निवडणुकांसाठी अजित पवार गटाने कंबर कसली आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून आढावा बैठका घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघासाठी देखील अजित पवार गटाकडून आढावा बैठक घेऊन निवडणूकीची तयारी करण्यात येत आहे.

मावळमध्ये अजित पवार गटातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांची आढावा बैठक झाली. मावळचे आमदार सुनील शेळके, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थितीत पार पडली.

दरम्यान यावेळी प्रदेश उपाध्यक्षपदी बापू भेगडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह महिलांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

अजित पवार गटाच्या बैठकीत आमदार सुनील शेळके यांनी मोठा विश्वास व्यक्त केला.'मी ठामपणे सांगतो आतापर्यंत राष्ट्रवादीचा खासदार मावळात झालाच नाही. जर मावळला राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेची तिकीट दिली तर दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून आणू , असा ठाम विश्वास मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला. डबल ढोलकी वाजवणाऱ्या कार्यकर्त्यांचेही आमदारांनी कान टोचले. तिकडे जायचं असेल तर आताच जावे. नाहीतर आत्ताच आपली भूमिका जाहीर करा, असेही शेळके म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT