NCP Vs Shivsena Saamtv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने महायुतीत वादाच्या ठिणग्या? राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जोरदार प्रत्युत्तर

Maharashtra Political News : तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने महायुतीत वादाच्या ठिणग्या पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. शिंदे गटाचे नेते मंत्री तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'कोण तानाजी सावंत? मी त्यांना ओळखत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. मी राष्ट्रवादीसोबत कॅबिनेट बैठकीलाही बसत नाही. मला त्यांच्यासोबत बसणंही सहन होत नाही, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं. सुनिल तटकरे म्हणाले, 'आम्ही त्यांना विचारून एनडीएमध्ये सहभागी झालो का? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत चर्चा करून आम्ही सत्तेत सहभागी झालो होतो. त्यामुळे युतीत खडा टाकणाऱ्यांवर बोलणार नाही. याबाबत एकनाथ शिंदे निर्णय घेतील'.

सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले, 'सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना दूधवाल्याची किंमत काय कळणार. त्यांना त्याच्या विषयी आत्मीयता देखील वाटणार नाही. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे आम्हीच पाईक आहोत, असं वाटणाऱ्यांची भाषा काल आपण ऐकली आहे'.

हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत बोलताना तटकरे म्हणाले, 'हर्षवर्धन पाटील यांना मेळाव्यात काय झालं,हे माहिती नाही. आम्ही रात्री वरिष्ठ नेते एकत्र बसलो. ताकदीने निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या दुसऱ्या मतदारसंघात वाद होत असतात'. यावेळी सुनील तटकरे यांनी रोहित पवारांवर टीका केली. 'जगातील सर्व अक्कल आपल्यालाच आहे, असं त्यांना वाटतं. तुम्ही त्यांची ऐतिहासिक यात्रा पाहिली असेल. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पिछाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT