Ajit Pawar Future CM in Maharashtra NCP Amol Mitkari Tweet, eknath shinde saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? CM शिंदे तडकाफडकी दिल्लीला, अजित पवार मुख्यमंत्री होणार?

Ajit Pawar News Today: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री अचानक दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar Future CM in Maharashtra NCP Amol Mitkari Tweet:  राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री अचानक दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा नियोजित दौरा नाही, अचानक ते दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

राज्यात सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहेत. त्यातच अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. रायगडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना देखील घडली आहेत, या सर्व घटनांनी राज्य हादरवून गेलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? असे तर्क वितर्क लावले जात आहेत.

अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार?

वर्षभरापूर्वी ज्या शिंदे गटाने अजित पवारांविषयी तक्रार करत शिवसेनेतून बंड केलं होतं, आता तेच अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार (Ajit Pawar News) यांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटात संभ्रमाचं वातावरण आहेत. त्यातच अजित पवार हे महाराष्ट्रातील मनातील मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवास्थानाबाहेर झळकले आहेत.

त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांचं टेन्शन वाढल्याची माहिती आहेत. दुसरीकडे अजित पवार यांच्या गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक सूचक ट्वीट केलं आहे. अजित पवार हे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या वाढदिवशी केलं आहे.

अमोल मिटकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अजित पवारांचा एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओला त्यांनी 'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व' असे कॅप्शन दिले. अमोल मिटकरी यांनी केलेलं ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या फोटोवर जादूटोणा? मोदींच्या फोटोजवळ हळद-कुंकू, लिंबू आणि नारळ; घटनेने खळबळ

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग

जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT