Ajit Pawar and Devendra Fadnavis lock horns over the promise of free Pune Metro travel ahead of civic elections. Saam Tv
मुंबई/पुणे

अजितदादांच्या जाहीरनाम्यात मेट्रो प्रवास मोफत, फडणवीसांनी उडवली दादांची खिल्ली

Ajit Pawar’s Free Metro Claim: सत्तेत आल्यावर पुणे मेट्रोचा प्रवास मोफत करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली...मात्र जाहीरनाम्यातील या घोषणेवरून दादा आणि भाऊ भिडलेत... पुणे मेट्रोचा प्रवास खरचं मोफत होऊ शकतो का?

Omkar Sonawane

मुंबईनंतर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलयं ते पुणे महापालिकेकडे ..कारण पुण्यात सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत थेट सामना रंगणार आहे. आपल्या जाहीरनाम्यात, महापालिकेवर सत्ता आल्यास पुणेकरांना मेट्रो प्रवास मोफत करण्याच्या घोषणेची फडणवीसांनी खिल्ली उडवलीय.... तर जिंकून आलो की करून दाखवेन, असं म्हणत अजित पवारांनी फडणवीसांनाच आव्हान दिलयं...

दरम्यान पुण्यात मेट्रो प्रवास मोफत करणं खरचं शक्य आहे का? आणि महापालिकेला मेट्रो प्रवासाचं गणित ठरवण्याचा अधिकार आहे का?

पुण्यात मेट्रोचे दोन मार्ग सुरू

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी.

मेट्रोचे आणखी 4 ते 5 मार्ग प्रस्तावित

मेट्रोची प्रवासी संख्या सध्या साधारणतः दोन ते सव्वादोन लाखांच्या दरम्

यान

प्रवासी तिकीटातून मेट्रोला दर महिन्याला अंदाजे 10 ते 12 कोटींचं उत्पन्न

2025 मध्ये मेट्रोला तिकीटातून 105 कोटीचं उत्पन्न

मोफत प्रवासाचा निर्णय पुणे महापालिकेच्या अखत्यारित नाही

निर्णय घेतला तरी अंतिम मान्यतेसाठी राज्य आणि केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक

गणेशोत्सवामध्ये दिवसाला सहा लाख प्रवासी मेट्रोनं प्रवास करतात... त्यावेळी मेट्रोची यंत्रणा कमी पडते. वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी तेवढ्याच गाड्यांचीही आवश्यकता आहे..निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपल्या जाहीरनाम्यातून मतदारांना वेगवेगळी आश्वासनं देत असतो.आता ही सगळी आश्वासन प्रत्यक्षात य़ेऊ शकतात याचा विचार सूज्ञ मतदारांनीच करायचा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT