Ajit Pawar On Sharad Pawar  Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: शरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'साहेबांचा निर्णय...'

Ajit Pawar on Sharad Pawar Withdraw Resignation: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा पवार साहेबांचा निर्णय राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा उत्साह, महाविकास आघाडीची ताकद वाढवणारा आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar on Sharad Pawar Withdraw Resignation: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पत्रकारपरिषद घेत मोठी घोषणा केली. आपण पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचं पवारांनी जाहीर केलं. त्यांच्या या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून स्वागत केलं जातं आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा स्वागत केलं आहे. (Breaking Marathi News)

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा पवार साहेबांचा निर्णय राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा उत्साह, महाविकास आघाडीची ताकद वाढवणारा आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

साहेबांनींच राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, असा आग्रह धरत, अध्यक्ष निवड समितीने साहेबांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला आणि साहेबांनीच अध्यक्षपदी कायम रहावे, हा निर्णय एकमताने घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात आणि देशात उज्जवल यश संपादन करेल," असा विश्वास व्यक्त देखील अजित पवार यांनी व्यक्त केला. (Latest Marathi News)

आदरणीय साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर घेतला असून त्यांचे वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी, एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करावे, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

आदरणीय साहेबांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमाने पक्षाच्या कामाला लागलो आहोत. आज उशीरापर्यंत मुंबईत (Breaking Marathi News) थांबल्यानंतर उद्या 6 तारखेला मी दौंड, कर्जत दौऱ्यावर जात आहे. 7 तारखेला बारामती, 8 तारखेला कोरेगाव, सातारा, 9 तारखेला सातारा, फलटण. 10 तारखेला उस्मानाबाद, लातूर, 11 तारखेला नाशिक आणि 12 तारखेला पुणे असा माझा दौरा कार्यक्रम असणार आहे, अशी माहितीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात शालेय पोषण आहार योजना घोटाळ्यावरुन कृती समिती आक्रमक

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT