Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar On Rumours: वेगवान राजकीय घडामोडींदरम्यान अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Ajit Pawar Press Conference: कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar News: राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार भाजपसोबत जात असल्याच्या चर्चा सुरु असताना आता स्वत: त्यांनीच याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. अशा बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असं अजित पवारांनी म्हटलं.

40 आमदारांच्या सह्या कुणीही घेतल्या नाही. सही घेण्याचं काहीही कारण नाही. या बातम्यांना काहीही आधार नाही. कुणी काय मत व्यक्त करावं हा त्यांचा अधिकार आहे. अनेक आमदार कामानिमित्त येत असतात. आजही नेहमीप्रमाणे आमदार भेटायला आले होते. आमदारांची वेगवेगळी कामं होती, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले. (Political News)

आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत. मात्र अशा बातम्यांमुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार होतो. अशा बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. राज्यातील महत्वाच्या प्रश्नावरुन लक्ष हटवण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.  (Latest Marathi News)

माध्यमांचे प्रतिनिधी माझ्या घराबाहेर कॅमेरे लावतात. तुम्ही अंदाज व्यक्त करताय. या गोष्टी थांबवल्या पाहिजे. माध्यमांनी सभ्यता पाळली पाहिजे. मी राष्ट्रवादीतच राहणार हे काय आता प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का, असा संतापही अजित पवारांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT