अजित पवार यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहे. बारामतीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून त्यांना शेवटचा निरोप दिला जाणार आहे.
आमदार संदीप क्षीरसागर यांची भावनिक पोस्ट.
दादा तुम्ही जिल्ह्याला नव्हे तर राज्याला पोरक करून गेलात.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांच्या विमानाला अपघात होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समजली आणि बीड जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला दादा तुम्ही पोरकं करून गेल्याची भावना दाटून आली.
आपल्या धडाकेबाज निर्णय क्षमतेमुळे आपले सर्वांच्या मनात कायम स्थान राहील. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच स्वप्न दादा अर्धवट राहिले. तुमच्या नेतृत्वात दादा सर्वकाही शक्य होते. मला आज शब्द सुचत नाहीत.
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीकडे रवाना झाले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातानंतर पुणे जिल्ह्यात दुखावटा जाहीर करण्यात आला असून पुणे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
बीड विधानसभेसाठी अजितदादांनी उमेदवारी देऊन ताकद दिली होती. मी पक्ष सोडला तरी त्यांच्यासोबत विकास कामावर बोलणं असायचे, शिस्तप्रिय नेता आणि खूप काही शिकण्यासारखं होतं. अशी प्रतिक्रिया भाजपा नेते योगेश क्षीरसागर यांनी दिली. आमचे अर्ध आयुष्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सानिध्यात गेलं. त्यामुळे दादांसोबत पारिवारिक नातं होतं. ही वेळ महाराष्ट्रात येईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. त्यामुळे बीड आणि महाराष्ट्राचं खूप मोठे नुकसान झाले आहे.
अजित दादा आपल्यात नाही ही जिव्हारी लागणारी घटना आहे, अजित दादांच्या जाण्याने नाईक परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे.स्पष्ट आणि स्वच्छ व्यक्तिमत्व असलेले अजित दादा नाहीत ही कल्पनाचं करवत नाही.राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी नगराध्यक्ष मोहिनी इंद्रनील नाईक यांना अश्रू अनावर. राज्यमंत्री इंद्रायणी नाईक हे बारामतीकडे रवाना झाले आहे.
अजित दादांना श्रद्धांजली देताना भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे भाऊक, डोळ्यात अश्रू तरळले
अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राची खूप मोठी हानी...
दादा आपल्यात नसणं न भरून येणारे नुकसान....
दूरदृष्टी असलेलं आणि उत्तम प्रशासक असलेल नेतृत्व....
सहकार कृषी उद्योग अशा अनेक क्षेत्रात दादांचा गाढा अभ्यास...
सामान्य माणसाशी जोडणारा नेता....
अजित दादांना स्वच्छतेची झाडांची खूप आवड....
अजितदादांच्या अनेक आठवणींना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिला उजाळा...
राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. हा अपघात केवळ एका व्यक्तीचा नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा मोठा धक्का आहे.
स्पष्टवक्ता, निर्णयक्षम आणि सामान्य माणसाच्या दुःखाशी नाळ जोडणारा असा एक दिलदार नेता महाराष्ट्राने गमावला आहे. त्यांच्या कर्तृत्वाने, नेतृत्वाने आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीने त्यांनी कायम जनमानसात स्थान मिळवले.
या दुःखद प्रसंगी परमेश्वर त्यांच्या परिवाराला हे असह्य दुःख पेलण्याची ताकद देवो, ही प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली
लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे, असे बाजी प्रभू देशपांडे बोलल्याची नोंद इतिहासात आहे. एक कर्ता व्यक्ती गेली की सगळी समीकरणे बदलून जातात. आज अजितदादांच्या जाण्याने या उक्तीची प्रकर्षाने जाणीव होते आहे. लवकर चिडणारा, फटकळ बोलणारा, स्पष्टवक्ता, पण तेवढ्याच लवकर चूक मान्य करून “सॉरी” म्हणणारा नेता गेला. निःशब्द !
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झालं यानंतर भाजपाचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी भावनिक होत अजित दादा प्रति असलेल्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना संवेदना व्यक्त करताना आमदार सुरेश धस
दोन दिवसांपूर्वी नांदेड येथे झालेल्या भेटीत विजयसिंह पंडित यांना सांगत होते मी जे सांगेल ते करायचं आपण बीडसाठी चांगलं काम करू असा विश्वास अजितदादांनी दिला होता त्याचबरोबर अजितदादांनी जी पगडी घातली होती त्या पगडीमध्ये अजित दादा चांगले दिसत होते दादा आपण एक फोटो काढू तुम्ही चांगले दिसत आहात ह्या आठवणी ज्यावेळेस विजयसिंह पंडित यांच्या तोंडून बाहेर येत होत्या त्यावेळेस त्यांना हुंदका भरला होता. अश्रू अनावर झाले अत्यंत विश्वासू म्हणून विजयसिंह पंडित यांच्यावर बीड नगर परिषदेची जिम्मेदारी दिली होती ती त्यांनी योग्यरीत्या पार पडली आणि अत्यंत जवळचे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होतं आणि आज अजित दादांना श्रद्धांजली अर्पण करताना विजयसिंह पंडित यांना अश्रू अनावर झाले.
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती रुग्णालयाबाहेर खूप गर्दी झाली आहे. कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहे.
महाराष्ट्र पोरका झाला, निर्मळ मनाचा नेता हरवला. दादा आम्ही पोरके झालो, राष्ट्रवादीचे माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांना अश्रू आनावर
बारामती रुग्णालयाच्या बाहेर मोठी गर्दी
अजित पवारांच्या कुटुंबातील सदस्य रुग्णालयात दाखल
अजित पवारांचे कार्यकर्ते, समर्थक सगळे रुग्णालयाच्या बाहेर
समर्थकांना अश्रू अनावर, अनेकांचे बांध फुटले
अजित पवारांच्या आजोळात शोककळा...
देवळाली प्रवरा गावात कडकडीतं बंद...
देवळाली प्रवरा गावात झाला होता अजित पवार यांचा जन्म...
तीन महिन्यापूर्वीच अजित पवार यांनी आजोळात केला होता दौरा...
सगळ्या मामांच्या घरी भेटी घेतल्याच्या आठवणी ताज्या...
अजित पवारांच्या आजोळात नागरिकांची गर्दी...
महाराष्ट्रासाठी आजचा दिवस काळा दिवस...अजितदादांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी
अजित पवार साहेबांचे अपघाती निधन ही केवळ एका पक्षाची किंवा कुटुंबाची हानी नसून, संपूर्ण राज्याची आणि देशाची मोठी हानी आहे. ते मनाने, तनाने आणि अंतकरणाने अत्यंत सुदृढ आणि खंबीर व्यक्तिमत्व होते.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी रात्रंदिवस कष्ट घेतले. राज्याच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता, आमदार राजू करेमोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काम करणारा नेता महाराष्ट्राने नाही तर देशाने गमावला
निर्णय घेण्याची क्षमता असलेला नेता म्हणून त्यांची ओळख
पवार परिवाराच्या भावना आता आपण समजू शकत नाही मात्र देव त्यांना या संकटातून सावरण्याची ताकद देऊ
अतिशय़ दुखत दुर्घटना घडली. विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुखद निधन झाल्याची वार्ता आम्हाला मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. अजित पवार महाराष्ट्रातील लोकनेतृत्व, कानाकोपऱ्याची माहिती असणारा, राज्याच्या प्रश्नाची जाण असणारा नेता होता. महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असणारा नेता हरपला, अशी प्रतिक्रिया त्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर प्रियांका गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
अपघातापूर्वी अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना झाला होता
विमानात बसण्यापूर्वी अजित पवारांचं बोलणं झालं
त्यानंतर बारामतीत उतरल्यावर पुढील बोलणं होणार होतं
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या आत्या
राणाजगजीतसिंह पाटील कुटुंब बारामतीकडे रवाना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित घटनेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र आणि भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हे ऐकून डोकं पूर्णपणे सुन्न झालं आहे. अजित पवारांविरोधात मी जिवापाड लढले आणि जन्मभर लढले असते, पण जे काही घडलं ते अत्यंत चुकीचं आहे,” असे त्यांनी म्हटले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “हे इतकं धक्कादायक आहे की ते स्वीकारणंच शक्य होत नाही. मला खूप मोठा धक्का बसला आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
अत्यंत दुःखद दिवस माझे आणि त्यांचे संबंध राजकारणापलीकडचे
खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही चर्चा करायचो
काल संध्याकाळी सात वाजता माझे आणि त्यांचे फोनवरून बोलणे झाले होते
काल मी त्यांच्यासोबत दिवसभरात तीनदा बोललो होतो
माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीमध्ये अनेक वेळा दादांनी मला सहकार्य केले,पाठिंबा दिला
पूर्ण पवार कुटुंबाला दुःख पचवण्याची देव शक्ती देवो
अजित दादांचं नेतृत्व हे ऑन दि स्पॉट काम करण्याचं नेतृत्व होतं
पंचवीस वर्षे संघटनेमध्ये त्यांनी मला काम करायची संधी दिली होती
माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिला जो 15 ते 20 वर्षाचा टप्पा होता ती सर्व राजकीय वर्ष मी अजितदादांसोबत काढली होती
अजित दादांचं जाणं हे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातली फार मोठी पोकळी आहे ती कधीहि भरून येऊ शकत नाही
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे मावळ्यातील सर्व शाळांना आज एक दिवसाची सुट्टी देण्यात आली..
हाराष्ट्राच्या राजकारणातील क्षितिजासारखा लखलखनारा तारा गेला .
मन सुन्न होणारी घटना आहे .
दादांच्या जाण्याने ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे .
शब्द सुचत नाही .
ज्याच्या भोवती राजकारण फिरते अशा व्यक्तीने निघून जाणे म्हणजे वेदनादायी आहे .
अतिशय जड अंतःकरणाने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण .
उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या अकाली एक्झिट मुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय सांगलीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांना अजित पवारांच्या निधनामुळे अश्रू अनावर झाले,दादांच्या जाण्याने राष्ट्रवादी पोरकी झाल्याची भावना आमदार इद्रिस नायकवडी यांनी व्यक्त केली आहे, बारामतीकडे रवाना होण्याआधी मिरजेत ते बोलत होते.
कालची भेट ही दादांची व माझी काळाने ठरवलेली शेवटची भेट ठरेल, याची तेव्हा कल्पनाही नव्हती…
कालच मंत्रालयातील दालनात एका महत्त्वाच्या विषयावर आमची चर्चा झाली... खुलताबाद (रत्नपूर), छत्रपती संभाजीनगर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकासाठी निधी मिळावा, अशी आग्रही मागणी मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली होती.
दादांनी केवळ माझे म्हणणे ऐकून घेतले नाही, तर येणाऱ्या अर्थसंकल्पात या स्मारकासाठी भरीव निधीची तरतूद करण्याचे सकारात्मक आश्वासनही दिले.
महाराष्ट्राचे लाडके 'दादा' आज आपल्यात नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. त्यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे.
प्रशासकीय कामातील शिस्त, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची वृत्ती आणि विकासाची दूरदृष्टी असलेला एक 'कार्यसम्राट लोकनेता' आज आपण गमावला आहे. विमान अपघाताची ही हृदयद्रावक घटना केवळ एका परिवाराची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे.
सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रद्धांजली
प्रणिती शिंदे अजित दादांना श्रद्धांजली वाहताना झाल्या भावुक
राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना आऊटऑफ द बॉक्स जाऊन अजित दादांनी निधी दिल्याचं सांगितल्या आठवणी
असे नेतृत्व पुन्हा होणे नाही असं म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली
घटनेची माहिती मिळाल्यानंतर देखील विश्वास बसत नाही आहे मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिक्रिया.....
महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक हानी काम करणारा नेता हरपला....
अजित दादांच्या अनुभवाच्या फायदा मला नेहमी झाला आहे....
महाराष्ट्राच्या कधी न भरून निघणारी हानी झाली आहे.....
अजूनही विश्वास बसत नाही आहे मात्र आजच्या दिवस अत्यंत दुःखी आणि नुकसानदायक आहे....
महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी दिवस, अजित दादांचे जाणे अत्यंत दुःखद; एकनाथ शिंदेंची अजितदादांना श्रद्धांजली व वाहिली आहे.
अजित पवारांचे निधन अत्यंत दुःखद- उज्जवल निकम
अजित पवारांच्या जाण्याने आजोळात शोककळा...
मामेभाऊ माजी आमदार चंद्रखेखर कदम यांना अश्रू अनावर...
अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा हे अजितदादांचे आजोळ...
अजितदादा माझ्यापेक्षा वयाने लहान पण कर्माने मोठे...
त्यांच्या जाण्याने देवळाली प्रवराचा आधारवड गेला...
पक्ष वेगळे असले तरी तीन महिन्यांपूर्वी मला भेटण्यासाठी आले...
तीच भेट शेवटची ठरली...
माजी आमदार चंद्रशेखर कदम यांची प्रतिक्रिया...
अजित पवारांचे दुःखद निधन झाले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पार्थ पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल दिल्लीतून रवाना
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान घेऊन बारामती मध्ये दाखल होणार
माझे वडील गेल्यानंतर दादानी कधी वडिल नाहीत याची जाणीव होऊ दिली नाही...
धनंजय मुंडेना अश्रू अनावर...
बारामती कडे रवाना...
अजित दादा पवार यांच्या अत्यंत दुर्दैवी अपघाताचे वृत्त समजताच धनंजय मुंडे हे तातडीने बारामती कडे रवाना झाले असून प्रवासादरम्यान आपल्या एका सहकाऱ्यांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते...
अजित दादा व धनंजय मुंडे यांचे एक वेगळेच नाते होते. पक्षातील सर्वात लाडका कोण, असे विचारल्यास दादा जाहीरपणे धनंजय मुंडे यांचे नाव घेत असत.. त्यामुळे अजित दादांच्या अकाली निधनाचे धनंजय मुंडे यांच्या साठी दुःख किती मोठे आहे हे न समजण्या पलीकडचे आहे.
अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा
आज आणि उद्या पुणे बंदची हाक
आमचा कुटुंब प्रमुख गेला अशा भावनिक प्रतिक्रिया माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केले आहे. अजित दादांच्या खूप मोठ्या आठवणी आहेत. त्यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह माजलगाव मतदार संघाचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया आमदार सोळंके यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे, प्रकाश सोळंके
अजित दादांचे निधन वैयक्तिक नुकसान- अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
अजित पवारांच्या विमान अपघाताचे व्हिडिओ समोर
अजित पवारांच्या अपघाती निधनावर माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
बच्चू कडू यांनी अजित दादांच्या निधनावर व्यक्त केला शोक
अजित दादांचं अचानक पणे झालं अतिशय दुखद घटना
अतिशय धाडसी, स्पष्ट, परखड, कामाचा माणूस आणि कार्यकर्त्यांसाठी धावणारा माणूस म्हणून अजितदादांची होती ओळख
दादांच्या या दुःखद निधनाने मोठा झटका बसला, बच्चू कडू यांनी व्यक्त केला शोक
प्रहार आणि बच्चू कडू तर्फे अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली
जवळचे मित्र आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचा नेता हरपला- पियुष गोयल
अजित पवारांच्या पुण्यातील जिजाई निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
जिजाई या निवासस्थानाबाहेर कार्यकर्ते जमायला सुरुवात
सध्या जिजाईवर अजित पवार कुटुंबातील कोणीही सदस्य नाहीत
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक, दुर्दैवी आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. गेली अनेक वर्षं राज्याच्या विधिमंडळात सोबत काम करताना अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. त्यांचे प्रशासनिक कौशल्य, विकासात्मक दृष्टिकोन आणि लोकांना जोडण्याची हातोटी यांमुळे अजितदादांचे कायमच महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान राहिले आहे. महाराष्ट्राच्या विकासाची आकांक्षा असलेल्या या लोकनेत्याचे अकाली निधन होणे, ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची कधीही भरून न निघणारी हानी आहे. या दुःखद प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो. ॐ शांती
नितीन गडकरी
मंत्री, रस्ते वाहतूक व महामार्ग
भारत सरकार
"Devasted"सुप्रिया सुळे यांचे स्टेट्स
खचून गेले, सुप्रिया सुळे यांचे स्टेट्स
Devastated याचा अर्थ मानसिकदृष्ट्या कोलमडलेला होतो
अजित पवार यांचा मुंबई पुण्यातील सगळा स्टाफ सुरक्षित असल्याची माहिती
केवळ मुंबईचे सुरक्षारक्षक विदीप जाधव हे अजित दादांसोबत होते
राष्ट्रवादीचे पाथरी विधानसभेचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजेश विटेकर यांना अजित पवारांचा मृत्यूच्या बातमीने अश्रू अनावर झाले आहेत परभणीच्या मानवत येथे प्रचारासाठी आले असताना सकाळी ही घटना कळल्यानंतर राजेश विटेकर यांना अश्रू अनावर झाले आहेत राजेश विटेकर हे अजित पवार यांची अत्यंत निकटवर्तीय आमदार आहेत
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे आज, २८ जानेवारी २०२६ रोजी एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे आणि चटका लावून जाणारे नुकसान आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.