अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत महत्वाची माहिती
‘श्रीमद्भागवत वाचली असती तर अपघाती मृत्यू झाला नसता’ असा दावा त्यांनी केला
अजित पवारांना आषाढी एकादशीला श्रीमद्भागवत ग्रंथ भेट दिल्याचा दावा
अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबीयांना धक्का बसला.
राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. श्रीमद्भागवत' वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. मागील आषाढी एकादशीला इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी 'श्रीमद्भागवत' ग्रंथ भेट म्हणून दिला होता. 'हा ग्रंथ तुम्ही नक्की वाचा', असा आग्रह त्यांनी अजित पवार यांच्याकडे धरला होता. मात्र अजित पवार यांनी हा ग्रंथ वाचला नसावा, असे सूरदासजी यांचे मानणे आहे.
इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. 'श्रीमद्भागवत' ग्रंथाचे वाचन केल्याने माणसाचा अपघाती मृत्यू टळतो, अशी त्यांची तीव्र श्रद्धा आहे. त्यामुळेच अजित पवार यांच्यासोबत घडलेला प्रसंग अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. अजित पवार यांचा काही महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. बारामतीजवळ त्यांचे विमान कोसळलं होतं. या अपघातामध्ये त्यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता.
सर्वप्रथम म्हणजे तुम्ही ज्या कोणत्याही भाषेतून हे जाणून घेता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की, जो कोणी हा श्रीमद्भागवत) ग्रंथ संपूर्णपणे आपल्या आयुष्यात स्वीकारतो किंवा अमलात आणतो, त्याचा अपघाती (अकाली) मृत्यू होत नाही. मी गेल्या आषाढी एकादशीला स्वतःच्या हातांनी अजित पवारजींना हा ग्रंथ भेट दिला होता आणि त्यांना विनंती केली होती की कृपया हा ग्रंथ नक्की वाचा. पण मला पूर्ण विश्वास आहे की त्यांनी तो वाचला नाही.
त्यामुळे जे काही घडले ते चांगले झाले नाही. मी गेल्या आषाढी एकादशीला त्यांच्या दालनात (ऑफिसमध्ये) जाऊन त्यांना हा ग्रंथ भेट दिला होता. मी त्यांना वारंवार हेच सांगत होतो, कदाचित त्या दिवशी तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना आठवत असेल मी त्यांना सांगितले होते की 'कृपया हा ग्रंथ वाचा, नक्की वाचा... याला इतर कोणत्याही सामान्य पुस्तकासारखे समजू नका.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.