Eknath Shinde and Ajit pawar  Ajit Pawar
मुंबई/पुणे

थेट सरपंच, नगराध्यक्ष निवडीवरून अजित पवारांची टोलेबाजी; दुसऱ्या कुणाला एकनाथ शिंदे व्हायचे असेल तर...

ज्यांच्याकडे पैसा आणि मसल पॉवर आहे त्याची दहशत राहील आणि हे लोकशाहीला घातक आहे - अजित पवार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Monsoon Assembly Session) आजचा तिसरा दिवस आहे. आजच्या दिवशी देखील शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांकडून सकाळपासून आंदोलन केली. विधानभवनामध्ये देखील विरोधकांनी अनेक प्रश्नावरुन सरकारला धारेवर धरलं.

अशातच थेट जनतेतून सरपंच निवडणुका घेण्याबाबतचे बिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधान भवनामध्ये मांडल्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या बिलाला कडाडून विरोध केला. 'सरपंच आणि नगराध्यक्ष जनतेतून करायचा म्हणताय तर मुख्यमंत्री देखील जनतेमधून निवडून आणा' हवा असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

थेट जनतेतून संरपंच आणि नगराध्यपदाच्या निवडणूका घेण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेत ते बिल आता मागे घ्यावे, दोन्ही बाजूच्या सदस्यांनी अभ्यास करुन मग ते बिल आणावे असा सल्लाअजित पवारांनी दिला.

पाहा व्हिडीओ -

यावेळी बोलताना पवार म्हणाले, ' थेट जनतेतून संरपंच आणि नगराध्यपदाच्या निवडीमुळे नगराध्यक्ष एका विचाराचा आणि नगरसेवक एका विचारांचे असे होते. एखादा निर्णय नगराध्यक्षाला घ्यावासा वाटला की बॉडी त्याला विरोध करते, त्यामुळे अनेक निर्णय रखडले जातात. जर नगराध्यक्ष जनतेतून करायचा असं मुख्यमंत्री म्हणतात, मग मुख्यमंत्री जनतेतून करा.

तुम्ही आधी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री केलं मग काही लोकांना घेऊन गेलात, जर दुसऱ्या कोणाला एकनाथ शिंदे व्हायचे असेल तर अशा जनतेतून नगराध्यक्ष निवडीने ते सार्थ होणार नाही, असा टोला देखील अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसंच या निर्णयामुळे गरिबांना प्रतिनिधित्व मिळणार नाही, आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणून काम करत असताना तुम्ही ४०-५० आमदारांना घेऊन गेलात आणि त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता. पण नगराध्यक्षाला तसेच राहावं लागेल.

सरपंच आणि नगराध्यक्ष थेट निवडीचा निर्णय याआधी देखील घेतला होता. मात्र तो यशस्वी झाला नाही, आम्ही पण लोकांमधून निवडून येतो, ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होतं नाहीत, इतर निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होतात. ज्यांच्याकडे पैसा आणि मसल पॉवर आहे त्याची दहशत राहील आणि हे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे हे बिल रद्द करावे. आपला या बिलाला विरोध आहे. नगरसेवकांमधून नगराध्यक्षपदाची निवड ठेवली पाहिजे त्यामुळे सर्वसामान्य माणूस नगराध्यक्ष होऊ शकतो असंही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोपरी पाचपाखाडीत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकत्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT