पुणे : पुणे शहराला काल रात्री पावसांना (Pune Rain) चांगलंच झोडपलं. कमी वेळेत जास्त झालेल्या पावसाने पुण्याची रस्ते जलमय झाले होते. रात्री 9 वाजेपासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरू झाला होता. पावसामुळे सखल भागात पाणी शिरल्याने रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं. पाऊस ओसरल्यानंतर आता पुणे महापालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) कालच्या पावसानंतर पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर चांगलेच बरसले आहेत.
स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला 'अव्यवस्थेची' कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील, असं अजित पवार यांनी म्हटलं.
पुढे त्यांनी म्हटलं की, तूर्तास पुण्यातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करतंच आहोत. जनतेनं देखील आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करतो. सर्व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती पाऊलं उचलून स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असून त्याचा आढावा आम्ही घेत आहोत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.