Ajit Pawar News
Ajit Pawar News  Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून २ विभूतींचा पुतळा का हटवला? अजित पवारांचा शिंदे सरकारला सवाल

Rashmi Puranik

Mumbai News: वि.दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हा प्रकार घडला. या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने शिंदे सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणावरून अजित पवारांनी महाराष्ट्र सदनातून २ विभूतींचा पुतळा का हटवला, असा सवाल उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)

अजित पवार म्हणाले, आम्ही मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. सावित्रीबाई फुले यांच्या बाबत लिखाण केले. आम्ही जाऊन पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. आता कहरच झाला आहे. एका वेबसाईटवर सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण आहे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवले. मुलगी शिकली तर घर पुढे जाते. इतके वर्ष झाल्यावर असे लिखाण करायचे'.

अजित पवार पुढे म्हणाले, 'सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अभिमान आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर नवीन पिढीने काम करावे हे म्हणणे असते. महापुरुषांबद्दल अपमान राज्यकर्ते करत आहेत. मागच्या राज्यपाल यांनी सुरूवात केली, मग मंत्र्यांनी भर घातली. पुढे प्रवक्यांनी भर घातली. त्यानंतर आमदारांनी भर घातली

'आम्ही मोर्चा काढला होता. आमचे म्हणणे इतकेच की, महागाई, रोजगार, शेतकऱ्यांचे समस्त प्रश्न महत्व आहेत. त्या प्रश्नाला महत्व द्यायच्या ऐवजी हे प्रश्न उचल खातात, असे अजित पवार म्हणाले.

'असे प्रकार होत असताना मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र सदनात एक कार्यक्रम झाला. तिथे योग्य जागा निवडून पुतले बसवले आहेत. त्यावेळी तेथील कार्यक्रमात पुतळे बाजूला केले जातात. महाराष्ट्र सदन स्पष्टीकरण काढतात, भावना दुखवायच्या नव्हत्या. मग पुतळा का हलवला? असा सवाल अजित पवारांनी शिंदे सरकारला केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video: शिवाजी पार्कवर मोदींचं स्वागत होत असताना राज ठाकरेंची बॉडिलॅग्वेज कशी होती?

Nagpur Crime : जुन्या वादातून युवा कॅबचालकाचा खून, दाेघांवर गुन्हा दाखल

Pani Puri: घरच्या घरी बनवा टम्म फुगलेली पाणीपुरी, सोपी रेसीपी

Actor Chandrakanth Dies : जवळच्या मैत्रिणीचा कार अपघातात मृत्यू, नैराश्यात बुडालेल्या अभिनेत्याने संपवलं जीवन

Raj Thackeray यांचा हात धरला, त्यांना पुढे आणलं! Devendra Fadnavis यांची कृती चर्चेत, Video पाहिलात?

SCROLL FOR NEXT