Sharad Pawar And Ajit Pawar NCP In Pune  Saam Tv
मुंबई/पुणे

Rohit Pawar : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, यामागचं कारण काय? रोहित पवारांनी स्पष्ट सांगितलं

Sharad Pawar And Ajit Pawar NCP In Pune News : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याची घोषणा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली.

Alisha Khedekar

  • पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट एकत्र लढणार

  • कार्यकर्त्यांचे म्हणणे समजून निर्णय घेतले

  • घड्याळाबरोबर न लढता स्वतंत्र दोन चिन्हांवर लढणार

  • प्रशांत जगताप यांच्या पक्ष सोडण्यावर रोहित पवारांच्या प्रतिक्रीया

महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर एकीकडे ठाकरे बंधू २० वर्षांनी एकत्र आले तर दुसरीकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे म्हटले आहे. सुरुवातीला दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याची चर्चा होती. मात्र शरद पवार गट महाविकास आघाडीबरोबर लढणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर आता यात मोठा ट्विस्ट बघायला मिळाला असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पुण्यातील महापालिका निवडणुकीला नवे वळण मिळणार आहे.

आज सकाळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, ''पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण स्वतंत्र चिन्हावर लढणार आहेत. यासंदर्भात सुप्रियाताई सुळे प्रत्येक कार्यकर्त्यांशी बोलल्या, शशिकांत शिंदेही बोलले. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा सर्व कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं मत आहे की, आपण घड्याळाबरोबर जाणं हे योग्य ठरू शकतं, त्यामुळे ही लढाई कार्यकर्त्यांची लढाई, हे इलेक्शन कार्यकर्त्यांचे इलेक्शन आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांचं म्हणणं समजून घेऊन आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत'' अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी यावेळेस दिली.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, ''कार्यकर्ते काही इनपुट देत असतात आणि त्या इनपुटमध्ये सातत्याने हेच येत होतं की, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला घड्याळाबरोबर जावं लागेल. आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही. आम्ही एकत्रित येऊन घड्याळ आणि तुतारी असे दोन चिन्ह घेऊन तिथे लढणार आहोत'', असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, रोहित पवार यांनी यावेळी बोलताना प्रशांत जगताप यांच्या पक्ष सोडण्यावरही भाष्य केलं.''प्रशांत जगताप हे चांगले पदाधिकारी होते. पण त्यांनी असा का निर्णय घेतला? कशामुळे घेतला? आज या ठिकाणी मी काय सांगणार नाही. त्याला वेगळी कारण आहेत, फार मोठे कारण आहे. त्यामुळे ते चांगलेच कार्यकर्ते होते. आम्ही एकत्रित काम केलं आहे,'' असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

भयंकर! अंगात कपडे नव्हते, हातात लाकडी दांडा; मनोरुग्णाच्या जीवघेण्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: महायुतीचे अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

मोठी बातमी! देशातील बड्या राज्याचे विभाजन होणार? भाजप नेत्याची मागणीने चर्चांना उधाण

अंतर्गत वादात काँग्रेस सत्ता गमावणार? तुम्ही खासदार आहात, मालक समजू नका

SCROLL FOR NEXT