Sharad Pawar Vs Ajit Pawar saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar Vs Ajit Pawar : विधानसभेत काकांचा दादांना धोबीपछाड? अजित पवारांचे निकटवर्तीय शरद पवार गटाच्या गळाला? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी महायुतीला धूळ चारत आपले वर्चस्व पुन्हा दाखवून दिले. त्यामुळे संपूर्ण राज्याचे राजकारण हे शरद पवारांभोवती फिरु लागले आहे. अजित पवार गटाचे अनेक इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्या पक्षांमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

मुंबई : लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त स्ट्राईक रेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा आहे. 10 जागा लढवून 8 जागांवर उमेदवारांचा विजय झाला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसाठी सहानभुतीची लाट पहायला मिळाली. विधानसभेतही पवारांचा करिश्मा पहायला मिळेल अशी स्थिती आहे. कारण पवारांची साथ सोडून गेलेले अनेक जुनेजाणते नेते पवारांकडे परतू लागले आहेत. विशेषत पश्चिम महाराष्ट्रात पवारांचा प्रभाव अजूनही दिसून येतोय. कोणत्या नेत्यांनी आत्तापर्यंत शरद पवारांची भेट घेतली आहे ते पाहूया...

अजित पवारांच्या पक्षाचे माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली आहे. ते तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. माजी आमदार रमेश कदम यांनी मविआच्या मेळाव्याला हजेरी लावत शरद पवारांची भेट घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता आहे. कारण कागलच्या समरजीत घाटगे यांच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय चंदगडचे शिवाजीराव पाटील तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा आहे.

पुण्यातील भोसरीचे आमदार विलास लांडेंनीही चार नगरसेवकांसह शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवारांची भेट घेतलेले इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटीलही तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. अजितदादांचे निकवटर्तीय दौंडचे माजी आमदार रमेश थोरातही तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत. भाजप नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये फक्त अजित पवारांचा शब्द चालायचा, त्या ठिकाणी अनेक जण दादांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. चिंचवडचे अनेक माजी नगरसेवक शरद पवारांकडे जाण्यासाठी इच्छुक आहेत. अजित गव्हाणे यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर आता चिंचवड विधानसभेसाठी नाना काटे देखील पवारांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. दादांचे खंदे समर्थक भाऊसाहेब भोईर देखील वेगळा विचार करण्याच्या तयारीत लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी महायुतीला धूळ चारत आपले वर्चस्व पुन्हा दाखवून दिले. त्यामुळे विधानसभेत सर्वांनाच पवारांच्या राष्ट्रवादीची भुरळ पडलीय. आणि म्हणूनच त्यांच्याकडे इच्छुकांच्या अर्जाचे ढिग लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT