Pimpri Chinchwad Corporation : ११ ठेकेदार वर्षभरासाठी ब्लॅक लिस्टेड; निकृष्ट कामांमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड महापालिकेकडून काढण्यात आलेल्या निविदांमध्ये सहभागी होऊन शहरातील विविध विकास कामांचे ठेके घेतले जात होते.
Pimpri Chinchwad Corporation
Pimpri Chinchwad CorporationSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : महापालिकेकडून निविदा काढून त्याचे काम कंत्राटदाराला दिले जात असते. मात्र अनेक ठेकेदाराकडून काम निकृष्ट दर्जाचे केले जाते. अशाच प्रकारे पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या स्थापत्य विभागाची निकृष्ट कामे करणाऱ्या ११ ठेकेदारांना पिंपरी चिंचवड महापालिकेने एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकलं आहे.

पिंपरी चिंचवड (Pimpri chinchwad) महापालिकेकडून काढण्यात आलेल्या निविदांमध्ये सहभागी होऊन शहरातील विविध विकास कामांचे ठेके घेतले जात होते. त्यानुसार ११ ठेकेदारांनी शहरातील विविध भागातील स्थापत्य विषयक केलेले १४ कामे हे निकृष्ट झाल्याचे दिसून आहे. यानंतर महापालिकेने कारवाई केली असून १४ कामे करणारे ११ ठेकेदार काळ्या यादीत टाकण्यात आले आहेत. यामुळे या ११ ठेकेदारांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत पुढील एक वर्षासाठी सहभागी होता येणार नाही.

Pimpri Chinchwad Corporation
Wada Crime News : इंस्टाग्रामवरुन प्रेमाच्या जाळ्यात ओढले; मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्या तरूणाला अटक

त्या ठेकेदारांकडून होणार दुप्पट रक्कम वसुली 

अजय घनश्याम खेमचंदानी, अनिकेत एंटरप्राईजेस, चैताली सप्लायर्स, कविता इंटरप्राईजेस, काव्य असोसिएश, मोटवानी अँड सन्स, नामदेव इंटरप्राईजेस, आर जी मंगळवेढेकर, रामचंद्र एंटरप्राइजेस, संनसारा कन्ट्रक्शन आणि सोहम इंटरप्राईजेस हे ११ ठेकेदार एक वर्षासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने काळया यादी टाकलं आहे. इतकेच नाही तर कामाची दुप्पट रक्कम वसूल करण्यात येईल अस पिंपरी चिंचवड मानगरपालिकेने स्पष्ट केल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com