Mumbai Viral Video
Mumbai Viral Video  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: पार्किंगच्या वादात एअर गन दाखवत धमकावले, घटनेचा धक्कादायक Video व्हायरल; आरोपीला अटक

Priya More

Mumbai News: मुंबईमध्ये पार्किंगवरुन झालेल्या वादात (Parking Dispute) एका व्यक्तीने एअर गनने (Air Gun) समोरच्या व्यक्तीला धमकावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एअर गन दाखवून धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे. ही घटना मुंबईच्या अँटॉप हिल (Antop Hill) परिसरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अँटॉप हिल परिसरात नितीन अरोरा (35 वर्षे) याचा पार्किंगवरुन एका व्यक्तीसोबत वाद झाला. सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर नितीन अरोराने संबंधित व्यक्तीवर हल्ला केला. त्यानंतर त्याने त्याच्याजवळ असलेली एअर गन काढून समोरच्या व्यक्तीला धमकावले. ही घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नितीन अरोराच्या हातामध्ये एअर गन असल्याचे दिसत आहे.

या घटनेनंतर संबंधित व्यक्तीने अँटॉप हिल पोलिस ठाण्यात धाव घेत नितीन अरोराविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी नितीन अरोराविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 504 आणि 506 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करत त्याच्याकडील एअर गन पोलिसांनी जप्त केली. नितीन अरोरा एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करतो. त्याच्याकडे एअर गन आली कुठून?, तो ही गन का बाळगत होता? तसंच किती दिवसांपासून त्याच्याकडे ही एअर गन आहे? याचा तपास अँटॉप हिल पोलिस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : धाराशिव मतदारसंघात ४१.२८ टक्के मतदान

Lizards News : बापरे! नागपूरमध्ये आढळली सापासारखी पाल; दुर्मिळ प्रजातीचा फोटो व्हायरल

Ranjitsinh Mohite-Patil News | रणजितसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची गळाभेट

प्रदर्शनाआधीच Jolly LLB 3 वादाच्या भोवऱ्यात, शुटिंग सुरू होताच न्यायालयात याचिका, नेमकं काय घडलं ?

Narendra Modi : कलम ३७०, राममंदिर अन्.. ४०० पार कशासाठी? PM मोदी थेट बोलले; काँग्रेसवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT