हे वक्तव्य केलंय मुंब्र्यातील नवनिर्वाचित एमआयएमच्या नगरसेविका सहर युनुस शेख यांनी... मुंब्र्यातील विजयी सभेत बोलताना सहर शेख यांनी आव्हाडांना ललकारतानाच मुंब्र्याचा रंग हिरवा करण्याचा नारा दिलाय..
सहर शेख यांचं हेच वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आणि त्यावरुन वादाचा भडका उडाला.. हे वक्तव्य गांभीर्यानं घेऊन हिंदुंना एकवटण्याचं आवाहन भाजपनं केलंय.,काँग्रेसनं धार्मिक धृवीकरण परवडणारं नसल्याचं म्हटलंय.. तर ठाकरेसेनेनं मात्र सहर शेख यांच्या वक्तव्याचा समाचार घेतानाच राष्ट्रीयत्वाची आठवण करुन दिलीय..
खरंतर सहर शेख यांचे वडील युनूस शेख हे जितेंद्र आव्हाडांचे कट्टर कार्यकर्ते होते.. मात्र सहर शेख यांना पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी न दिल्यानं त्यांनी एमआयएमममध्ये प्रवेश केला.. एवढंच नाही तर ती जागा सहर शेख यांनी जिंकलीही.. फक्त मुंब्राच नाही तर या पालिका निवडणुकीत राज्यभरात एमआयएमनं चांगलेच हातपाय पसरवलेत... धर्मनिरपेक्ष पक्षांची मुस्लीम मतं घेत एमआयएमनं हिंदूत्ववादी पक्षांप्रमाणेच महाराष्ट्रात कट्टरतावादाची बीजं रोवायला सुरुवात केलीय.. किती महापालिकांमध्ये एमआयएमने मुसंडी मारलीय...
संभाजीनगर - 33
मालेगाव - 20
नांदेड - 15
अमरावती - 12
धुळे - 10
सोलापूर - 8
मुंबई - 8
नागपूर - 6
ठाणे - 5
अकोला - 3
जालना - 2
अहिल्यानगर - 2
चंद्रपूर - 1
पुरोगामी महाराष्ट्रात कधीच धार्मिक भेदभाव नव्हता..मात्र आता सहर शेख यसारख्या युपीएससी परीक्षा दिलेल्या नवनिर्वाचित नगरसेविकेनं धार्मिक धृवीकरणाची भाषा केल्यानं निवडणुकांमधून विकासाचा मुद्दा मागे पडलाय. हा प्रकार असाच सुरु राहिला तर महासत्तेचं स्वप्न पाहणाऱ्या भारताची अवस्था धार्मिक कट्टर असलेल्या पाकिस्तान आणि बांग्लादेशसारखी होईल, हे मात्र निश्चित...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.