Mla Sangram Jagtap, Nagar, Maharashtra Government, long march saam tv
मुंबई/पुणे

Ahmednagar News : आमदार संग्राम जगतापांच्या शिष्टाईनंतर नगर महापालिका कर्मचा-यांचा लाँगमार्च स्थगित

लाँग मार्चचा आज तिसरा दिवस हाेता.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Nagar News : नगर महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे मंत्रालयावर धडकण्यासाठी सोमवारी रवाना झाले. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शहरातील महानगरपालिकेचे सर्व कामकाज ठप्प झाले. दरम्यान भळवणी येथे आमदार संग्राम जगताप यांनी कर्मचा-यांना आश्वासित केल्यानंतर हा लाँग मार्चचा आज तिस-या दिवशी स्थगित करण्यात आला आहे. (Maharashtra News)

हा लाँग मार्च सुरू झाल्यावर नगर शहरचे आमदार संग्राम जगताप हे मुंबईत ठाण मांडून होते. आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठका घेऊन नगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

दहा ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मुंबई येथे बैठक आयोजित केली असून त्या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग निघेल असे आश्वासन आज (बुधवार) सकाळी आमदार संग्राम जगताप यांनी लाँग मार्च साठी निघालेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना भाळवणी येथे दिले.

यावेळी आमदार जगताप यांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना आपला लॉंग मार्च मागे घ्यावा असे आवाहन केले. त्यानूसार अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने कामगार सेनेचे अध्यक्ष आनंद लोखंडे यांनी लॉंग मार्च मागे घेत असल्याची घोषणा केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT