Darshana Pawar Rahul Handore Case Updates Saam TV
मुंबई/पुणे

Darshana Pawar News: राहुल दर्शनाचा नातेवाईक होता का? दोघांमध्ये कधीपासून ओळख? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

Rahul Handore: या संपूर्ण घटनेनंतर राहुल हंडोरे हा दर्शनाचा नातेवाईक होता का? दोघांमध्ये कधीपासून ओळख होती? असा प्रश्न अनेकांना पडला.

साम टिव्ही ब्युरो

Darshana Pawar and Rahul Handore: संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या दर्शना पवार हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावला. दर्शना पवार हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल हंडोरे याला अटक केली. आपणच दर्शनाची हत्या केल्याची कबुली आरोपी राहुलने पोलिसांना दिली. दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर राहुल हंडोरे हा दर्शनाचा नातेवाईक होता का? दोघांमध्ये कधीपासून ओळख होती? असा प्रश्न अनेकांना पडला.

दरम्यान, पुणे पोलिसांनी (Pune Police) आरोपी राहुल हंडोरे याच्याबाबत काही महत्वाची माहिती दिली. राहुल हंडोरे आणि दर्शना पवार हे नातेवाईक नव्हते. दर्शना पवारच्या मामाचं घर आहे. त्याच्या समोरचं घर हे राहुल हंडोरे याचं होतं. त्यामुळं ते एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते, असं पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी माध्यमांना सांगितलं.

दर्शनाची हत्या करणारा राहुल हंडोरे कोण आहे?

दर्शना पवार हिची हत्या करणारा आरोपी राहुल हंडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शाह गावाचा रहिवाशी आहे. त्याने BSC पर्यंतचे शिक्षण घेतलं आहे. राहुल हा पुण्यात MPSC ची तयारी करत होता. मागच्या अनेक वर्षांपासून राहुल बाहेरगावी शिकत असल्याने गावात त्याच्याबाबत अनेकांना माहिती नाही. मात्र राहुल याचे कुटुंबीय गावात राहत असल्याने सुट्ट्यांसाठी राहुल शाह गावात यायचा त्यामुळे मोजकीच लोकं त्याला ओळखत होती.

राहुल हंडोरे दर्शना पवारचा कोण होता?

राहुल हा मामाच्या घरासमोर (Ahmednagar) राहत असल्याने दर्शना आणि त्याची लहानपणापासूनच ओळख होती. पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना दोघांमधील मैत्री आणखीच घट्ट झाली. दोघेही लग्न करणार होते. राहुल स्पर्धा परीक्षेच्या तयारीसह फूड डिलिव्हरी सर्विसमध्ये काम करीत होता. राहुल याने परीक्षेपूर्वी तिच्याशी ब्रेकअप केले होते.

राहुल हंडोरेने दर्शना पवारची हत्या का केली?

दर्शनाची लोकसेवा आयोगामार्फत वन अधिकारी (आरएफओ) पदावर निवड झाली. त्यानंतर राहुल पुन्हा लग्नासाठी तिच्या मागे लागला होता. दरम्यान, दर्शनाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी जमवल्याने राहुल अस्वस्थ होता. त्याने परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असे त्याने सांगितले. परंतु दर्शनाकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, दर्शना ही ९ जून रोजी पुण्यात एका खासगी अकॅडमीतर्फे आयोजित सत्कार समारंभासाठी आली होती. त्यानंतर ती सोमवारी (ता. १२) राहुलसोबत सिंहगड आणि राजगड किल्ला फिरण्यासाठी दुचाकीवर गेली होती. तिथेच राहुल याने तिची हत्या केली. हत्येनंतर तो पसार झाला होता. तेव्हापासून पुणे पोलीस त्याचा शोध घेत होते.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT