Pune Police Transfer Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Police Transfer: ऐन निवडणुकीच्या तोंडावर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, आयुक्तांचे रात्री उशिरा आदेश

Pune Police Transfer: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे पोलीस आयुक्तालयातील २३ पोलीस निरीक्षक, १९ सहायक निरीक्षक आणि ७६ उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश सोमवारी रात्री उशिरा काढले.

Sandeep Gawade

Pune Police Transfer

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे पोलीस आयुक्तालयातील २३ पोलीस निरीक्षक, १९ सहायक निरीक्षक आणि ७६ उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश सोमवारी रात्री उशिरा काढले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच विभागांमध्ये बदलांचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनामध्ये ही खांदेपालट झाली आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर प्रस्थापित झालेल्या आणि पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांनी निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकीय हस्तक्षेप अथवा कोणालाही मदत होऊ नये, म्हणून अशा बदल्या करण्याचा प्रभात आहे. यंदा राज्य निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात तसे परिपत्रक काढले होते, त्याला अनुषंगून या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच आचारसंहिता जारी होण्याचे संकेत मिळत आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

NEETचा पेपर कसा फुटला? यश यादवकडे कुठून आला पेपर?

SCROLL FOR NEXT