ST Employee Saam TV
मुंबई/पुणे

आंदोलन शरद पवारांच्या घराबाहेर; बंदोबस्त मात्र परबांच्या बंगल्याच्या बाहेर

आमची मागणी तिच असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. आता एसटी कर्मचाऱ्यांना खासदार सुप्रिया सुळे सामोऱ्या गेल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील राहत्या घरी एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्या नंतर आता परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या बंगल्याच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी आवाहन केल्यानंतर, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आज, शुक्रवारी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्ये शरद पवार यांच्याविरोधात घोषणा देत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना थोपवण्यासाठी पोलीस विनंती करत आहेत. पण कर्मचारी शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देत आहेत. आम्हाला एसटीचे विलीनीकरण करायचे आहे. आमची मागणी तिच असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. आता एसटी कर्मचाऱ्यांना खासदार सुप्रिया सुळे सामोऱ्या गेल्या आहेत.

दरम्यान एसटी महामंडळाचं विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल त्रिसदस्यीय समितीनं दिल्यानंतर त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर एसटी संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयात काल सुनावणी होऊन, त्याबाबत निकाल देण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावे असे निर्देश न्यायालयाने दिले होते. २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्यास सांगितले होते. राज्य सरकारच्या वतीने परिवहन मंत्री अनिल परब यांनीही कर्मचाऱ्यांना आवाहन केले होते. निश्चित कालावधीत कामावर रुजू झाल्यास कारवाई होणार नाही, असं परब यांनी सांगितलं होतं.

न्यायालयाच्या निकालानंतर आणि सरकारने केलेल्या आवाहनानंतरही एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. संप मागे घेण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका मांडली नव्हती. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी कर्मचारी आंदोलन करतील, असे आवाहन केले होते. त्यानंतर आज, शुक्रवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानासमोर आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचारी कमालीचे आक्रमक झालेले दिसले. त्यांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला पवार जबाबदार असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection : 'थामा' की 'एक दीवाने की दीवानियत'; भाऊबीजेला कोणता शो हाऊसफुल? वाचा कलेक्शन

Crime: संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याची हत्या, अनैतिक संबंधाच्या संशयावरून संपवलं; पिंपरी-चिंचवड हादरले

दिवाळी गिफ्टसाठी हट्ट, मालकाकडून शिवीगाळ करत अमानुष मारहाण, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Today's Panchang: आज कार्तिक शुक्ल तृतीया; अनुराधा नक्षत्राचा योग देणार शुभ फल, जाणून घ्या आजचं संपूर्ण पंचांग

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

SCROLL FOR NEXT