Pune CNG price hike Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात CNG दरवाढी विरोधात निघणार विराट मोर्चा; रिक्षाचालक होणार सहभागी

गेल्या काही महिन्यांपासून इंधन दर स्थिर होते, पण आता इंधन दरात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: गेल्या काही महिन्यांपासून इंधन दर स्थिर होते, पण आता इंधन दरात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलमध्ये प्रत्येकी ८ पैसे तर सीएनजी (CNG) मध्ये तब्बल ६ रुपयांनी वाढ झाली आहे. राज्य सरकारने पेट्रोल- डिझेलमध्ये कर कमी करुन महिनाही झाला नाही, मात्र त्या आधीच पुन्हा इंधन दरात वाढ झाली आहे. आजपासून पेट्रोल १०५.९१ रुपये तर डिझेल ९२.४३, सीएनजी ९१ रुपयांनी मिळणार आहे, त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या दरवाढी विरोधात आता पुण्यात ९ ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. (CNG Price Increases Again Reaches Rs 91 Per Kg In Pune )

हा मोर्चा ९ ऑगस्ट रोजी खासदार गिरीष बापट यांच्या कार्यालयावर निघणार आहे. या मोर्चात पुणे, पिंपरी चिंचवड मधील रिक्षा चालक सहभागी होणार आहेत. सकाळी १० ते १.३० वाजेपर्यंत पुण्यासह, पिंपरी चिंचवड मधील रिक्षा सेवा बंद राहणार आहे.

रिक्षाचालकांच्या अडचणी खासदार बापट त्यांच्यामार्फत केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा वाजता हुतात्मा स्मारक बुधवार पेठ, मजूर अड्डा हा मोर्चा सुरू होईल, तसेच पुढे जाऊन हा मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचणार आहे.

मुंबईतही सीएनजीचे दर वाढले

सीएनएजीच्या दरात प्रति किलोमागे सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात प्रति किलो चार रुपयांनी वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. महिन्याभरातील ही दुसरी दरवाढ आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या वाढत्या किमतींमुळे ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईत सीएनजीचे दर प्रति किलो 86 रुपये तर पीएनजीचे दर प्रति किलो 52. 50 रुपयांवर पोहोचले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शिअल एलपीजी सिलेंडर स्वस्त झाले, तर दुसरीकडे सीएनजी (CNG) गॅसच्या दरात वाढ झाल्याची बातमी समोर आली आहे. देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशला लागून असलेल्या राज्यात सीएनजी आणि पीएनजी महाग झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Gondia Travel: मुंबईवरून गोंदियाला प्रवास करणार आहात? जाणून घ्या रेल्वे, बस आणि विमानाचे सर्व पर्याय

IND vs AUS: काय ही फालतूगिरी? वारंवार पावसाचा व्यत्यय, फक्त ३२-३२ ओव्हर्सचा सामना, काय आहे नियम?

Maharashtra Live News Update : पुढचा कार्यक्रम ३ वाजता समजेल- राज ठाकरे

Musician Passes Away: जगप्रसिद्ध संगीतकाराचे निधन; वयाच्या ४८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

Jui Gadkari Photos: "तुला पाहता आजही, हासते या मनी चांदणे" जुई गडकरीचं फोटोशूट चर्चेत

SCROLL FOR NEXT