Board Exam
Board Exam Saam Tv
मुंबई/पुणे

...तोपर्यंत आम्ही दहावी-बारावीचे पेपर चेक करणार नाही; विनाअनुदानित शिक्षकांचा आक्रमक पवित्रा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: कायम विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी १०० टक्के अनुदानाच्या मागणीकरिता आंदोलनाचे हत्यार उपसल्यानं बोर्डाच्या (board) परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. यावेळी १० वी आणि १२ वीच्या निकालाला उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कायम विनाअनुदानित शाळा (School) कृती समितीने उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. विना अनुदानित शाळांसाठी प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान मिळावे आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना (employees) सेवा संरक्षण मिळावं या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

हे देखील पहा-

विनाअनुदानित शाळांमध्ये बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिका पडून आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पेपर तपासणीसाठी घेऊन जायला शिक्षकांनी नकार दिला आहे. यामुळे १० वी १२ वी बोर्ड परीक्षेचे निकाल उशीरा जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण विनाअनुदानित शाळा कृती समितीने १० वी १२वी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. राज्यात साडे आठ हजार शाळांमध्ये बोर्डाचे पेपरचे गठ्ठे तपासणीविना पडून असून शिक्षक बोर्डाचे पेपर तपासायला तयार नाही.

विनाअनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सेवा संरक्षण या मुख्य मागण्यांसाठी हा बहिष्कार (Boycott) टाकण्यात आला आहे. 24 फेब्रुवारी रोजी संघटनेने करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, यानंतर सुद्धा कुठल्या प्रकारची मागणी मान्य न झाल्याने हे सर्व शिक्षक बहिष्कारावर ठाम आहेत. मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होत असतात. बोर्डाचे विषयावार पेपर झाल्यावर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात.

मात्र, १० वी आमो १२वीचे ६ ते ७ पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एक देखील पेपर तपासायला घेतलेला नाही. बोर्डाचे पेपरचे गठ्ठे शाळेत पडून आहेत. मात्र, आम्ही तपासणीला सुरुवात करणार नाही जर बोर्डाच्या परीक्षा निघायला उशीर झाला तर त्याला राज्य सरकार जबाबदार असणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana News: धक्कादायक! शेगाव एस. टी. आगाराचा कारभार प्रशिक्षणार्थींच्या हातात; प्रवाशांच्या जिवाशी खेळ

Morning Drinks: दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी सकाळी 'या' पेयांचे करा सेवन, शरीर राहील निरोगी

Anil Deshmukh Full Speech | शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरून देशमुखांनी खडेबोल सुनावले

Manoj Jarange Patil News | बीडच्या नारायणगडमध्ये जरांगेंची सभा!

Jayant Patil Full Speech | ताईंना हरवण्यासाठी पैसे खर्च, जयंत पाटलांची सडकून टीका

SCROLL FOR NEXT