ड्युटीवर असणाऱ्या पोलिसाला मारहाण; तळीरामांना पडली महागात!

अलिबाग न्यायालयाचा निकाल
court
courtराजेश भोस्तेकर
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड: जनतेच्या सुरक्षेचे आणि कायदा व्यवस्था चोख राखण्याचे काम करणाऱ्या पोलिसाला दारूच्या नशेत केलेली मारहाण केल्याने पुण्यातील ५ जणांच्या चांगलीच अंगलट आली असून जेलची हवा खावी लागली आहे. ५ जणांना अलिबाग न्यायालयाने (court) दोषी ठरवून सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पुणे हवेली येथून रमेश लिंबाजी डफळ, बबन लिंबाजी डफळ, सुभाष गुणाजी वेळकर, अक्षय दिलीप गायकवाड, आतिष विठ्ठल गायकवाड हे ५ जण ६ एप्रिल २०१९ दिवशी पर्यटनासाठी मुरुड (Murud) तालुक्यातील काशीद समुद्र किनारी आले होते.

हे देखील पहा-

काशीद समुद्रकिनारी परिसरात मुरुड अलिबाग (Alibag) रस्त्याच्या बाजूला असलेल्या सुरुच्या वनामध्ये ५ ही आरोपी मद्य प्राशन करण्यास बसले होते. मुरुड पोलीस (Police) ठाण्याचे पोह समीर परशुराम म्हात्रे हे काशीद समुद्रकिनारी आपली ड्युटी बजावत होते. यावेळी ५ आरोपी हे मद्याप्रशन करत असल्याचे दिसले होते. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यास मनाई असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. म्हात्रे याच्या त्या बोलल्याचा राग मनात धरुन मद्यपी आरोपींनी त्यांना शिवीगाळ आणि मारहाण (Beating) केली होती. तसेच पो. कॉ. सागर रसाळ हे सदर भांडण सोडविण्याकरिता गेले असता त्यांनाही आरोपींनी (accused) शिवीगाळ आणि दमदाटी केली होती.

court
इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांचा भारत दौरा संशयाच्या भोवऱ्यात; जाणून घ्या काय आहे कारण

याबाबत मुरुड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता. मुरुड पोलिसांनी याप्रकरणी अलिबाग न्यायालयात आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. रायगड (Raigad) तदर्थ जिल्हा न्यायाधीश १ व अति सत्र न्यायाधीश जयदिप मोहिते यांनी महत्वपूर्ण निकाल देत आरोपींना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यामध्ये अति शासकीय अभियोक्ता स्मीता धुमाळ– पाटील यांनी सरकारपक्षातर्फे कोर्टासमोर केलेला युक्तिवाद महत्वपूर्ण ठरला. आरोपीत मद्यधुदांना सश्रम कारावासाची शिक्षा करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com