Pune Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: लग्नात मनासारखा हुंडा न दिल्याने छळ; पुण्यात वैष्णवीनंतर आणखी एका विवाहितेने आयुष्य संपवलं

Dowry Case Pune : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच हडपसर परिसरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Bhagyashree Kamble

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच हडपसर परिसरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून हुंडाच्या कारणावरून झालेल्या छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. या घटनेमुळे पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे.

देवकी उर्फ दीपा प्रसाद पुजारी (वय वर्ष २२) असे मृत महिलेचे नाव आहे. तिने गळफास घेत आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दीपाचे वडील गुरुसंगप्पा म्यागेरी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पती प्रसाद चंद्रकांत पुजारी, दीर प्रसन्ना चंद्रकांत पुजारी, सासू सुरेखा चंद्रकांत पुजारी आणि सासरे चंद्रकांत पुजारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपा आणि प्रसाद यांचा विवाह १८ एप्रिल २०२५ रोजी विजयपूर (कर्नाटक) येथील बसव मंगल कार्यालयात पार पडला. लग्नादरम्यान, दीपाच्या वडिलांनी लेकीच्या सासरच्या मंडळींना भरभरून हुंडा दिला होता. दीपाच्या कुटुंबाने त्यांना चार तोळे सोने आणि अंदाजे १० लाख रुपयांचा खर्च करत मानपान आणि हुंडा दिला होता.

लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी दीपा पुण्यातील सासरी आली. मात्र त्या दिवसापासूनच तिच्यावर हुंड्याच्या नावाखाली छळ सुरू झाला. भांडी, फ्रीज, इतर वस्तू दिल्या नाहीत, असा मुद्दा काढून दीपा या विवाहितेला तिचे पती आणि सासरच्यांनी शिवीगाळ आणि मारहाण केली, असा आरोप तिच्या वडिलांनी केला.

हुंडासाठी छळ सुरू झाल्यानंतर दीपाने या प्रकाराची माहिती तिच्या वडिलांना दिली. सासरच्या जाचाला कंटाळून तिने माहेर गाठलं. सासऱ्याने समजूत घातल्यानंतर ती पुन्हा पुण्यात आली. १८ मे रोजी दीपाने माहेरी फोन करून सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या जाचाबद्दल माहिती दिली. मात्र, दुसऱ्याच दिवशी १९ मे रोजी दीपाने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर दीपाच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, त्यांनी सासरच्या मंडळींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या हडपसर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT