Waroli Bandh Saam Tv
मुंबई/पुणे

Waroli Bandh : महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधानाचे पुण्यापाठोपाठ मुंबईतही पडसाद; आज वरळी बंद

सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वरळीत बंद पाळण्याचं आवाहन सर्व आंबेडकरवादी तसेच इतर संघटनांनी केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Worli Bandh : महापुरूषांबाबतच्या वादग्रस्त विधानाचं प्रकरण आता दिवसेंदिवस चिघळत चाललं आहे. पुण्यापाठोपाठ (Pune) आता मुंबईतील वरळीतही (Waroli) बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वरळीत बंद पाळण्याचं आवाहन सर्व आंबेडकरवादी तसेच इतर संघटनांनी केलं आहे. आज वरळीत सर्व दुकानं बंद ठेवून आंदोलन करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात आज वरळीत बंद पाळण्यात येणार आहे. आंबेडकरवादी आणि इतर संघटनांकडून हा बंद पुकारण्यात आला आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत केला जाणार आहे. तसेच कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकार विरोधात आज वारळी बंदची हाक पुकारण्यात आली आहे. तसेच १७ तारखेला महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जाणार आहे. दरम्यान, वरळी परिसर हा आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात येतो. त्यामुळे या वरळी बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलन केल्यास आदित्य ठाकरे या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT