म्हाडा, टीईटीपाठोपाठ पोलीस भरतीही संशयाच्या भोवऱ्यात
म्हाडा, टीईटीपाठोपाठ पोलीस भरतीही संशयाच्या भोवऱ्यात Saam tv
मुंबई/पुणे

म्हाडा, टीईटीपाठोपाठ पोलीस भरतीही संशयाच्या भोवऱ्यात

अमोल कविटकर, पुणे

पुणे - जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख यांच्या घरातून २०१९ व २०२१ च्या पोलीस भरती परीक्षेतील तीन विद्यार्थ्यांची ओळखपत्रे पुणे पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे आता म्हाडा, टीईटीपाठोपाठ पोलीस भरतीही संशयाच्या भोवऱ्यात आहे.याआधी देखील त्यांच्या घरी टीईटी परीक्षांची अपात्र परीक्षार्थींची ओळखपत्रे, हाॅलतिकीट सापडले होते. यामुळे पोलीस भरती परीक्षेतील मोठा गैरव्यवहार चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे देखील पहा -

जी.ए. साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी कंपनीने राज्यात काेल्हापूर, नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, साेलापूर आदी ठिकाणी पोलीस भरती परीक्षा घेतल्या आहेत.पुण्यासह काही ठिकाणी पाेलिसांनी परीक्षा पद्धतीवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवल्याने गैरकारभारास वाव मिळाला नाही. मात्र इतर काेणत्या ठिकाणी गैरप्रकार झाला का, याबाबत पोलीस तपास करणार आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर रात्री थरार; चिकन तंदुरीवरून वाद उफाळला, तरूणाला रस्त्याच्या मधोमध संपवलं

Today's Marathi News Live : पंतप्रधान मोदींचा आज पुण्यात मुक्काम

Maharashtra Election: इंडिया आघाडीचं सरकार आलं तर कोण होणार पंतप्रधान? पटोलेंनी उघडं केलं गुपित

Aligarh News : मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला; नवरा-बायकोवर गुन्हा

ED, CBI तुमच्या हातातील बाहुले होते, मग तुम्ही 2014 ची निवडणूक का हारले; काँग्रेसच्या आरोपांवर PM मोदी संतापले

SCROLL FOR NEXT