Rutuja Latake Saam TV
मुंबई/पुणे

पोट निवडणुकीनंतर लटकेंना मातोश्रीमध्ये एन्ट्री देखील देणार नाहीत; शिंदे गटाचा ठाकरेंवर गंभीर आरोप

एखाद्या दिवंगत आमदाराच्या पत्नीला त्रास देणं योग्य नाही. शिवाय अशा प्रकारे ठाकरे गट जो छळवाद करत आहे तो योग्य नाही - पावसकर

Jagdish Patil

भूषण शिंदे -

मुंबई: ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांच्याकडून पोट निवडणूक लढवणार मात्र, नंतर त्यांना मातोश्रीवर एन्ट्री सुद्धा देणार नाहीत असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी केला आहे.

ते अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनामा प्रकरणावर भाष्य प्रतिक्रिया देत होते. यावेळी त्यांनी शिंदे गटाकडून लटके यांच्यावर कसलाही दबाव नसल्याचंही त्यांनी सांगितलं. (Andheri East Assembly by-election)

पावसकर (Kiran Pavaskar) म्हणाले, जर कोणाला कामावर भरती करायची असेल तर दबाव आणला जाऊ शकतो. ते आपण समजू शकतो. पण कोणाला स्वच्छेने कामावरुन जायचं असेल तर त्याच्यावर कसा आणि कोण दबाव आणू शकतो असं पावसकर म्हणाले.

पाहा व्हिडीओ -

शिवाय या प्रकरणामध्ये शिंदे गटाचा कसलाही दबाव नाही. मात्र, अशा प्रकारच वातावरण तयार करण्यामागे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा काय उद्देश आहे हे मला माहीत नाही. शिवाय लटके यांचा पती आमदार होता, त्यांच्यावर अशी वेळ आली की, त्यांना सांगावे लागतं 'मी शिंदे गटाला भेटली नाही' हे दुदैवी आहे. असं एखाद्या दिवंगत आमदाराच्या पत्नीला त्रास देणं योग्य नाही. शिवाय अशा प्रकारे ठाकरे गट जो छळवाद करत आहे तो योग्य नसल्याचंही पावसकर म्हणाले.

तसंच ऋतुजा लटके शिंदे गटाकडे आलेल्या नाहीत, भेटलेल्या नाहीत तरी देखील असा अफवा पसरवल्या जात आहेत. इतक्या खालच्या पातळीचे राजकारण शिंदे साहेब करणार नाहीत. मात्र, असं राजकारण उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा केलं असून त्याचे मी शंभर पुरावे देईल असा दावा देखील त्यांनी केला.

दरम्यान,आमदार बाळा सावंत यांचे कर्करोगाने निधन झालं त्यावेळी त्यांची पत्नी तृप्ती सावंत यांनी पोट निवडणूक लढवली आणि त्या जिंकल्या पण 2019 मध्ये जेव्हा पुन्हा उमेदवारी द्यायची वेळ आली तेव्हा त्यांना मातोश्री मध्ये वेळ सुद्धा दिली नाही आणि आता सुद्धा हेच करणार, निवडणूक लढवणार आणि नंतर त्यांना मातोश्री वर इंट्री सुद्धा देणार नाहीत असा गंभीर आरोप देखील पावसकरांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT