Marathi Department in Xavier College Saam Tv
मुंबई/पुणे

Marathi Department in Xavier College : मुंबईच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये ४० वर्षांनंतर पुन्हा 'मराठी'

Marathi Department in Xavier College: मुंबईतील प्रसिद्ध सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये ४० वर्षांनंतर मराठी विषय पुन्हा शिकवला जाणार आहे.

Chetan Bodke

St Xavier College In Mumbai: मुंबईतील प्रसिद्ध सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये ४० वर्षांनंतर मराठी विषय शिकवला जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत (NEP) प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळेच आता या कॉलेजमध्ये मराठी विषयाचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे.

राज्यातील मराठी शाळांची अवस्था सध्या भयंकर आहे. मराठी शाळांना विद्यार्थी मिळत नाही. पटसंख्या नसल्याने काही शाळा बंद आहेत. तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आणावे लागत आहे. पण मुंबईतील प्रसिद्ध सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये ४० वर्षांनंतर पुन्हा मराठी विषय शिकवण्यात येणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळेच हे शक्य झाले आहे.

१९८५ मध्ये मराठी विभाग झाला होता बंद

सेंट झेव्हियर्स कॉलेजमधील मराठी विभाग १९८५ मध्ये बंद करण्यात आला होता. या विभागात मोजकेच विद्यार्थी होते. याशिवाय जे प्राध्यापक एकहाती हा विभाग सांभाळत होते, ते देखील निवृत्त झाले होते. त्यानंतर बीए (मराठी) अभ्यासक्रम बंद करण्यात आला होता.

काही कारणांमुळे संपूर्ण विभाग कार्यान्वित ठेवणं अशक्य असल्याने कॉलेज व्यवस्थापनाने मराठी विषय पर्याय म्हणून पदवीच्या पहिल्या वर्षासाठी सुरू ठेवला. अवघ्या १० टक्के विद्यार्थ्यांनी या विषयाला पसंती दिली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय शिक्षण धोरणातील एईसी अंतर्गत मराठी भाषेचा पर्याय दिला जाईल. विद्यार्थ्यांना आता मुख्य, आणि ऐच्छिक विषयांसोबत मराठी विषय निवडण्याचा पर्याय असेल. पहिली फेरीतील प्रवेश १९ जूनपासून सुरू झाले असून, आतापर्यंत १२० विद्यार्थ्यांनी मराठी विषय निवडला आहे. सेंट झेव्हियर्स कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र शिंदे यांनी सांगितले की, मोरेश्वर पेठे हे मराठी विभागात कार्यरत होते. मराठी विभागात सेवा देणारे ते एकमेव प्राध्यापक होते. १९८४ मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर हा विभाग बंद करण्यात आला. (Mumbai)

'त्यावेळी अभ्यासक्रमासाठी फारच कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. कॉलेजने नंतर मराठीसाठी पार्ट टाइम शिक्षक नेमण्याचा प्रयत्न केला, पण संख्या कमी होत गेली. वर्षभरात मराठीचा अभ्यासक्रम बंद झाला. त्यामुळे आमच्याकडे १९८५-८६ पासून पदवी महाविद्यालयात मराठी विषय उपलब्ध नाही', असे मुख्याध्यापक शिंदे यांनी सांगितले. (Latest Marathi News)

'२०१६ - १७ मध्ये एग्नेलो मेनेझेस हे प्राचार्य असताना कनिष्ठ महाविद्यालयाने मराठी अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. पण विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला. आम्ही बऱ्याच वर्षांपासून मराठी अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करत होतो. पण प्रत्यक्षात सुरू करण्यात अपयश आले. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळं आम्ही मराठी विषय पुन्हा सुरू करू शकलो याचा आनंद आहे. पहिल्याच वर्षी १२० विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आहे, असे प्राचार्य शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT