Basavaraj Bommai Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Vs Karnataka: महाराष्ट्रातल्या ४० गावांनंतर आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही कर्नाटकचा दावा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra-Karnataka Border Dispute: जत तालुक्यातल्या 40 गावांचा वाद ताजा असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी (Basavaraj S Bommai) आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करत बोम्मईंनी हा दावा केला आहे. 'कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. उलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावं, अशी आमची मागणी आहे' असं बोम्मई म्हणालेत. (Basavaraj S Bommai Latest News)

याशिवाय त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केले असून त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. राज्याची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध असल्याचं बोम्मई म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोलापूरसह राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ४० गावं कर्नाटकात सामील होतील, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. सांगली (Sangali) जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. या मुद्द्यावर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांनंतर आता बोम्मईंनी आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोम्मईंना यांना याअगोदरच प्रत्युत्तर दिलं होतं. (Latest Marathi News)

महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही, असं सणसणीत उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बसवराज बोम्मई यांना दिलं होतं. ज्या ठरावाचा उल्लेख बोम्मई यांनी केला आहे, तो ठराव 2012 साली केला होता. त्यानंतर कुणीही अशा प्रकारची मागणी केली नाही. असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं.

दरम्यान, संजय राऊतांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ४० गावं ताब्यात घेणार असल्याच्या वक्तव्यावरुन राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हे मिंधे सरकार आहे, हे कमजोर सरकार आहे मात्र, आम्ही महाराष्ट्रासाठी लढत राहू असह राऊत म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT