Gunratan Sadavarte saam tv
मुंबई/पुणे

Gunaratna Sadavarte: विद्वान असतील त्यांना घ्यावं, पण विशिष्ट समाज...'; मराठा आरक्षण समितीवर गुणरत्न सदावर्तेंचा आक्षेप

Gunaratna Sadavarte News: मराठा आरक्षणासाठी नेमललेल्या शिंदे समितीवर मराठा आरक्षणाचा विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे

Vishal Gangurde

Gunaratna sadavarte on Martha Reservation:

मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरची डेडलाइन दिली आहे. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार दरबारी हालचाली वाढल्या आहेत. या मराठा आरक्षणासाठी सरकारने याआधीच शिंदे समितीची स्थापना केली आहे. आता याच समितीवर मराठा आरक्षणाचा विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे. (Latest Marathi News)

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी 'टीव्ही९ मराठी'शी बोलताना मराठा आरक्षणावर मोठं भाष्य केलं. सदावर्ते म्हणाले, 'कोणत्याही एका धोरणावर आपण समिती नेमतो, त्यावेळी आपण तटस्थ भूमिका ठेवली पाहिजे. विशिष्ट समाजासाठी काम करण्यासाठी विशिष्ट समाजाचे न्यायाधीश नेमू लागलो, तर या प्रकारची परंपरा चांगली नाही'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'मला कोणत्याही निवृत्त न्यायाधीशांच्या समाजावर बोलायचे नाही, पण अशी परंपरा चांगली नाही. या समितीत विद्वान असतील तर त्यांना घ्या. पण विशिष्ट समाजाचे असती तर अशा प्रकारचं काम देऊ नये, अशी भूमिका सदावर्ते यांनी स्पष्ट केली.

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्यावर मोठं भाष्य केलं होतं. यावेळी सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाचा विरोध केला होता. तसेच मनोज जरांगे यांच्या सभेवरही टीका केली होती. त्यानंतर सदावर्ते यांच्या दोन कारची तोडफोड केली होती. त्यानंतर आता सदावर्ते यांनीही मराठा आंदोलकांच्या हिंसक कारयांविरोधात याचिका दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naagin 7 : मौनी रॉय, तेजस्वी प्रकाशनंतर कोण बनली 'नागिन'? चेहरा आला समोर, पाहा VIDEO

Liver Damage Tea: गरमागरम चहाने दिवसाची सुरुवात करताय? लिव्हरवर होईल गंभीर परिणाम, संशोधनातून माहिती समोर

Pune : पुरंदरमध्ये जमिनी विकत आहात? त्याआधी वाचा PMRD चा कडक इशारा , नेमकं काय आहे प्रकरण?

Shocking: हात-पाय बांधले, कुकरच्या झाकणाने गतिमंद विद्यार्थ्याला बेदम मारहाण; संभाजीनगरात धक्कादायक प्रकार; VIDEO व्हायरल

ऑक्टोबर - नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT