नगरपरिषद आणि पंचायतींचा कार्यकाळ संपल्याने प्रशासक नेमणार; नगर विकास विभागाने काढले आदेश... 
मुंबई/पुणे

नगरपरिषद आणि पंचायतींचा कार्यकाळ संपल्याने प्रशासक नेमणार; नगर विकास विभागाने काढले आदेश...

नगरपरिषद (Municipal Council) आणि पंचायतींचा (Panchayat) कार्यकाळ संपल्याने त्याजागी प्रशासक नेमण्यात येणार आहे, याबाबत नगर विकास विभागाने आदेश काढले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: संपूर्ण जगभर पसरलेल्या साथरोग कोविड १९ च्या राज्यात झालेल्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणूकांकरिता (Election) निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नसल्याने व मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने संदर्भ क्र. १ च्या अनुषंगाने मुदत समाप्तीनंतर संबंधित नागरी स्थानिक संस्थेमध्ये प्रशासक नियुक्ती करण्याबाबत संदर्भ क्र. २ अन्वये राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. त्यानुसार आता नगरपरिषद (Municipal Council) आणि पंचायतींचा (Panchayat) कार्यकाळ संपल्याने त्याजागी प्रशासक नेमण्यात येणार आहे, याबाबत नगर विकास विभागाने आदेश काढले आहेत. (Administrator to be appointed at the end of the term of Municipal Council and Panchayat; Orders issued by the Urban Development Department)

हे देखील पहा -

या आदेशात म्हटलं आहे की, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील तरतुदी व विशेषतः संदर्भ क्र.१ अन्वये अंतर्भूत केलेल्या कलम ३१७ (३) मधील तरतुदीनुसार सोबत जोडलेल्या सहपत्रातील तपशीलाप्रमाणे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व मुख्याधिकारी यांची आपल्या विभागातील संबंधित नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या प्रशासक पदी नियुक्ती करण्यात येत आहे.

सबब संबंधित नगरपरिषदा व नगरपंचायतींची मुदत संपताच तेथे सहपत्रातील स्तंभ क्र.४ मध्ये नमुद केल्यानुसार संबंधित उप विभागीय अधिकारी, तहसिलदार व मुख्याधिकारी यांच्या नावाने आपल्या स्तरावरुन आदेश काढून सदर अधिकाऱ्यांना प्रशासक पदाचा कार्यभार स्विकारण्याबाबत सूचित करावे, तसेच अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबत देखील सूचित करावे. एकुणच पाहता कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निवडणुका घेण्यास विलंब झाल्याने नगरपरिषद आणि पंचायतींचा कारभार हा काही काळ प्रशासकांकडे जाणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT