Badlapur अजय दुधाणे
मुंबई/पुणे

दुकानांवरील पाट्या मराठीत नसल्यास होणार कारवाई; दुकानदारांना अल्टीमेटम

बदलापूर शहरातील दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत करण्याचे आदेश

अजय दुधाणे

बदलापूर: बदलापूर शहरातील दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत करण्याचे आदेश (Order) आस्थापना विभागाने दुकानदारांना (shopkeepers) दिले आहेत. याबाबतची नोटीस दुकानदारांना देण्यात आली आहे. पुढील ८ दिवसात दुकानदारांनी पाट्या मराठीत न केल्यास प्रशासनाकडून (Administration) कारवाई करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात राज्य सरकारने (State Government) राज्यात दुकान आणि आस्थापनाच्या पाट्या मराठीत करण्याचा आदेश दिला होता.

हे देखील पाहा-

मात्र, या आदेशाची अद्याप कुठेही अंमलबजावणी झाली नाही. बदलापूर (Badlapur) शहरात सुद्धा अनेक दुकाने आणि आस्थापनाच्या पाट्या अजूनही इंग्रजी किंवा इतर भाषेत आहेत. त्यामुळे दुकानांच्या पाट्या मराठीत कराव्या याबाबत प्रशासनाकडून दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. सोमवारपर्यंत पाट्या मराठीत करण्याचे आदेश दुकानदारांना देण्यात आले आहेत.

दुकानांच्या पाट्या मराठीत करताना इतर भाषेतील अक्षरे मराठीपेक्षा मोठी नसावीत अशा सूचनाही यावेळी दुकानदारांना करण्यात आल्या आहेत. सोमवारपर्यंत दुकानांच्या पाट्या बदलण्याची मुदत व्यापाऱ्यांना देण्यात आली आहे. याबाबत दुकानदारांनीही सामंजस्याची भूमिका घेत दुकानांच्या पाट्या बदलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सर्व दुकानाच्या पाट्या मराठीत करण्यात येतील अशी माहिती व्यापारी संघटनेचे सचिव श्रीराम चुंबळे यांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT