aditya thackeray  saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Assembly Session: हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच - आदित्य ठाकरे

आता तुम्ही मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्तिथ केला.

Shivani Tichkule

मुंबई - आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर बसणारे भाजपा आता सत्ताधारी बाकावर बसलेले पाहायला मिळणार आहे.

याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध करताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

हे देखील पाहा -

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही लोकशाहीचा खून करणाऱ्यांच्याविरोधात उभे आहोत. हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच," असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. हे सरकार घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि बेईमानांचं सरकार असून नक्की कोसळणार असंही ते म्हणाले.

आमदार प्रकाश सुर्वे याच्याविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "हे डरपोकांचं विधान आहे. मुख्यमंत्री आणि खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिला आहे, असं मला वाटत नाही. म्हणून अशी गुंडगिरीची भाषा आपल्या महाराष्ट्रात होत आहे. आता तुम्ही मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्तिथ केला.

महाराष्ट्रात गुंडांना स्थान नाही. जनतेला धमकावणारे आमदार असे मोकाट फिरत असतील तर पुढे आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचे काय हाल होणार आहेत असे देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणले.

दरम्यान, खातेवाटपानंतर शिंदे सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असून हे अधिवेशन १७ ते २५ ऑगस्टपर्यंत हे चालणार आहे. आजपासून सुरु होणाऱ्या या अधिवेशनामध्ये राज्य सरकारला अनेक मुद्द्यावरुन घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gujrati actress On Election: गाफील राहून चालणार नाही...; गुजराती अभिनेत्रीचा अस्खलित मराठीमध्ये मोलाचा सल्ला

CM Devendra Fadnavis: माझ्या बोटावरची शाई पुसत नाही, राज ठाकरेंच्या आरोपावर CM फडणवीसांचे उत्तर

Municipal Elections Voting Live updates : उमेदवाराची पोलिसांसोबत बाचाबाची

मार्कर शाई पुसलीच जात नाही, फेक नरेटिव्ह पसरवला जातोय, आयोगाकडून स्पष्टीकरण, वाचा नेमकं काय म्हणाले...

Kiss And Smile Face Yoga: नियमित करा 'किस अँड स्माईल' योगा, अवघ्या २ दिवसांत होईल चेहरा गोरा

SCROLL FOR NEXT