Kirit Somaiya Saam Tv
मुंबई/पुणे

ठाकरे सरकारकडून माझ्या हत्तेचा कट : किरीट सोमय्या

Kirit Somaiya: ५८ कोटी चोरल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे, हे धोतांड असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: आयएनएस विक्रांतसाठी (INS Vikratn) अर्धा एका तासात किती निधी गोळा होणार आहे. आता ११ वर्षानंतर हिशोब मागितला जात आहे. दहा बारा खोक्यामध्ये किती पैसे जमणार. त्यावेळी दहा ते पाच हजार जमले होते. विक्रांत वाचवण्यासाठी आम्ही त्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटलो होतो. यात शिवसेनेचे (Shivsena) नेतेही सामिल होते. विक्रांत वाचवा ही देशभक्तीची मोहिम होती. यात ५८ कोटी चोरल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे, हा आरोप म्हणजे धोतांड आहे. संजय राऊत असं धोतांड करुन त्यांचे गुन्हे लपवत असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ठाकेर सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांनी (Police) जो गुन्हा दाखल केला आहे. पण त्यांना हा गुन्हा मागे घ्यावा लागणार आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांवर सध्या गुन्हे दाखल आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे. यशवंत जाधव यांच्यावर सध्या कारवाई सुरु आहे, मी राज्यातील भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे, असही भजप नेते (BJP) किरीट सोमय्या (Kirit somaiya) म्हणाले.

यशवंत जाधव आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई सुरु झाली आहे. मी महाराष्ट्रातील भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे. माझ्या हत्तेचा कट ठाकरे सरकार करत असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी याेवळी केला.

आमची लढाई राज्यातील माफिया सरकार विरुध्द आहे. दोन दिवसात हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर आयकर विभाग कारवाई करणार आहे. मनी लॉड्रींग प्रकरणी आदित्य ठाकरे यांना हिशोब द्यावा लागणार असल्याचे सोमय्या म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून भाजप विरुध्द सेना आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

SCROLL FOR NEXT