aditya thackeray reached at silver oak to meet sharad pawar after st bus workers protest Saam Tv
मुंबई/पुणे

ST Bus Strike: पवारांच्या भेटीसाठी आदित्य ठाकरे सिल्वर ओकवर

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आवाहन केल्यानंतर, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आज, शुक्रवारी शरद पवार यांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात घोषणा दिल्या. आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या तीव्र आंदोलनानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे शरद पवारांना भेटण्यासाठी पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दाखले झाले आहेत. (aditya thackeray reached at silver oak to meet sharad pawar after st bus workers protest)

हे देखील पहा -

एसटी महामंडळाचं विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल त्रिसदस्यीय समितीनं दिल्यानंतर त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर एसटी संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयात काल, गुरुवारी सुनावणी होऊन, त्याबाबत निकाल देण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावे असे निर्देश न्यायालयाने दिले होते. २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्यास सांगितले होते. राज्य सरकारच्या वतीने परिवहन मंत्री अनिल परब यांनीही कर्मचाऱ्यांना आवाहन केले होते. निश्चित कालावधीत कामावर रुजू झाल्यास कारवाई होणार नाही, असं परब यांनी सांगितलं होतं.

न्यायालयाच्या निकालानंतर आणि सरकारने केलेल्या आवाहनानंतरही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अधांतरी राहिला होता. संप मागे घेण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका मांडली नव्हती. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी कर्मचारी आंदोलन करतील, असे आवाहन केले होते. त्यानंतर आज, शुक्रवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानासमोर आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचारी कमालीचे आक्रमक झालेले दिसले. त्यांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला पवार जबाबदार असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT